मूग व उडदाला भाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:31 AM2017-09-12T00:31:33+5:302017-09-12T00:33:07+5:30

गेल्या वर्षाच्या तुलनेत १ हजार रुपयांनी कमी दर : पहिल्या दिवशी १ हजार क्विंटल उडदाची आवक

There is no mood and turmoil | मूग व उडदाला भाव नाही

मूग व उडदाला भाव नाही

Next
ठळक मुद्देपहिल्या दिवशी ५० लाखांची उलाढाल़शेतकºयांसमोरच लिलाव प्रक्रिया़उडदाचे दर ४ ते ५ हजारांपर्यंत़

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारपासून नवीन हंगामातील मूग व उडीद लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र शेतकºयांना अपेक्षित दर न मिळाल्याने अनेक शेतकरी माल विक्री न करताच माघारी परतले. दरम्यान, पहिल्याच दिवशी १ हजार क्विंटल उडीद तर १५० क्विंटल मुगाची आवक झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती प्रकाश नारखेडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सकाळी १० वाजता लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली. सभापती प्रकाश नारखेडे व संचालक मंडळातील काही सदस्यांनी लिलाव प्रक्रियेसाठी आलेल्या शेतकºयांचे स्वागत केले. यंदा बाजार समितीकडून लिलाव प्रक्रिया झाल्यानंतर शेतकºयांना तत्काळ पैसे दिले जात आहे. पहिल्याच दिवशी बाजार समितीत जळगाव तालुक्यासह जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील अनेक शेतकरी आपला माल घेऊन दाखल झाले होते.
शेतकºयांसमोरच लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली. या वेळी व्यापाºयांकडून मालाची तपासणी केल्यानंतर उडदाची प्रत खराब असल्याचे कारण देत ४ हजार रुपयांपासून उडदाचा दर निश्चित करण्यात आला. त्यामुळे अनेक शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली. पहिल्या दिवशी ४ ते ५ हजार रुपये क्विंटल असा दर उडदाला मिळाला तर मुगाला ४ हजार ते ४ हजार ५०० रुपये भाव मिळाला.
गेल्या वर्षी उडदाचे दर ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांपर्यंत होते. त्यामुळे भविष्यात दर वाढतील या आशेने अनेक शेतकºयांनी बाजार समितीच्या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला नाही.
अनेक शेतकरी माल घेऊन परत गेले असले तरी, पहिल्या दिवशी बाजार समितीत १ हजार क्विंटल उडीद व १५० क्विंटल मुगाची आवक झाली असल्याचा दावा सभापती प्रकाश नारखेडे यांनी केला. त्यातून ५० लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे त्यांनी सांगितले. शासनाकडून उडदाला ५ हजार २०० रुपयांचा दर निश्चित केला आहे. मात्र अजूनही शासकीय खरेदी सुरू झाली नाही, त्यामुळे लवकरात लवकर शासकीय खरेदी सुरू करण्यात यावी, अशी मागणीदेखील शेतकºयांकडून करण्यात आली.


 

Web Title: There is no mood and turmoil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.