बळीराजाला दिलासा नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 05:00 PM2018-12-15T17:00:14+5:302018-12-15T17:00:39+5:30

मालाला भाव मिळत नसल्याने बळीराजा मेटाकुटीस

There is no relief for the victims | बळीराजाला दिलासा नाहीच

बळीराजाला दिलासा नाहीच

Next

विजयकुमार सैतवाल, जळगाव
जळगाव : भाजीपाला उत्पादक शेतकरी असो की कांदा उत्पादक अथवा कडधान्य उत्पादक शेतकरी, या कोणालाच्याच मालाला भाव मिळत नसल्याने बळीराजा मेटाकुटीस आला आहे. हंगामात माल हाती पुरेसा माल आला असली तरी त्यास भाव मिळत नसल्याने कांदा, टमाटे मातीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत असून चांगले उत्पादन येत असल्याने बळीराजा खूष तर आहे, मात्र बाजारात हाच भाजीपाला आणल्यानंतर त्यास भाव मिळत नसल्याने तो हैराण होत आहे.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत टमाट्याच्या भावात ३०० रुपये प्रती क्विंटलने घट होऊन लाल टमाटे ७०० रुपये प्रती क्विंटलवरून ४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहे. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ८५० रुपये प्रती क्विंटल असलेल्या कांद्याचे भाव कमी होऊन ते ७५० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. भेंडीचे भाव ५०० रुपये प्रती क्विंटलने कमी होऊन ते १५००, कारल्याचे भाव ३०० रुपये प्रती क्विंटलने कमी होऊन ते १५०० रुपयांवर आले आहेत. या सोबतच गेल्या आठवड्यापासून वांग्याची आवक वाढलेली असून वांग्याचे भाव ५०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहे. कोथिंबीरचेही २५०० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. पत्ता कोबी २० रुपये प्रती किलो, फूलकोबी ३० रुपये प्रती किलो, हिरवी मिरची २० रुपये प्रती किलो, मेथीची भाजी १० रुपये जुडी विक्री होत आहे. त्यामुळे एवढा माल येऊनही अपेक्षित रक्कम बळीराजाच्या हाती पडत नसल्याचे चित्र आहे.
अशाच प्रकारे दोन आठवड्यांपूर्वी ७५०० ते ८००० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाच्या डाळीच्या भावात घट होऊन ती ७००० ते ७४०० रुपयांवर आली आहे. उडीदाच्या डाळीचे भाव ६००० ते ६३०० रुपये प्रती क्विंटल, हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ६००० ते ६४०० रुपये प्रती क्विंटलवर आहेत. तूरडाळीचेही भाव ७००० ते ७४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहे.
गव्हामध्येही १४७ गहू २६५० ते २७५० रुपये प्रती क्विंटल, लोकवन गहू २५५० ते २६०० रुपये, शरबती गहू २७५० ते २८५० रुपये प्रती क्विंटल, चंदोसी ३८५० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवर आले आहे.
 

Web Title: There is no relief for the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.