आंतरराष्टÑीय बाजारात कापसाला उठाव नसल्याने दरात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:30 PM2019-01-21T12:30:50+5:302019-01-21T12:31:47+5:30
भाव वाढतील या अपेक्षेने केवळ ४० टक्केच विक्री
अजय पाटील
जळगाव : कापसाच्या भावात वाढ होईल या अपेक्षेने शेतकºयांकडून जानेवारी अर्धा संपत आल्यावर देखील कापूस विक्रीसाठी आणला जात नसल्याने, खान्देशच्या जिनींगमध्ये सध्या कापूस टंचाई जाणवत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. जानेवारीपर्यंत भाव वाढतील अशी अपेक्षा शेतकºयांना होती. मात्र, आंतरराष्टÑीय बाजारात कापसाला उठाव नसल्याने भावात वाढ न होता घट होत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे आधीच शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीत कापसाला शासनाकडून चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा असताना यंदा कापसाला शेतकºयांचा अपेक्षित भाव मिळू शकला नाही. सुरुवातीला भाव मिळाल्याने शेतकºयांनी आपला माल विक्रीसाठी आणलाच नाही. ज्या शेतकºयांना गरज होती. अशा शेतकºयांनी आपला माल बाजारात आणला. दरम्यान, जानेवारीमध्ये तरी कापसाच्या भावात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकºयांना असताना जानेवारीत भाव न वाढता कापसाच्या दरात सारखी घटच होत आहे.
८ लाख हेक्टर लागवडच्या तूलनेत केवळ ७ लाख गाठींचे उत्पादन
खान्देशात यंदा ८ लाख हेक्टर जमीनीवर कापसाची लागवड झाली आहे. त्यामुळे खान्देशात सुमारे २५ लाख गाठींचे उत्पादन होणे अपेक्षित होते. मात्र, १२ जानेवारीपर्यंत खान्देशात ७ ते ८ लाख लाख गाठींचे उत्पादन आतापर्यंत झाले आहे. गेल्या वर्षी बोंडअळीची समस्या असताना देखील खरेदी चांगल्या प्रकारे होती. मात्र, यंदा कापसाची गुणवत्ता चांगली असताना देखील कापसाला चांगला भाव मिळू शकलेला नाही.
निर्यातदारांचे सौदेही थांबले
भारतीय निर्यातदारांनी जानेवारीपासून आपले सौद्यांचे करार केले होते. त्यांच्याकडील निर्यात सुरु झाली असती तर भावात काही प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा होती. मात्र, डिसेंबरच्या आधी निर्यातदारांनी आपले सौदे केले होते. त्यावेळी डॉलरचे दर ७२ रुपये इतके होते. मात्र, आता डॉलरचे दर भारतीय रुपयाच्या तूलनेत ३ रुपयांनी कमी झाले असून सध्याचे दर ६९ रुपये इतके आहेत. त्यामुळे निर्यातदारांनी देखील आपले सौदे थांबविले आहेत. निर्यातदांचे सौदे सुरु राहिले असते तर खान्देशातील कापूस उत्पादक शेतकºयांना लाभ मिळाला असता कारण निर्यातदारांना खान्देशातील कापूस निर्यात करण्यासाठी सोईस्कर असल्याने निर्यातदारांकडून खान्देशातील कापसाला प्राधान्य दिले जात असल्याची माहिती हर्षल नारखेडे यांनी दिली.
भावात घट होण्याचे कारण
संक्रांतीनंतर कापसाच्या दरात वाढ होईल असा समज शेतकºयांचा असतो. मात्र, यंदा भावात सध्या कोणतीही वाढ झालेली नाही. यामागे काही महत्वाचे कारण असून, यामध्ये भारतातील सूत मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मंदी निर्माण झाली आहे. त्यामुळे सूत मार्केटसाठी घेतला जाणारा कापूस सध्या घेतला जात नाही. प्रोडक्शन होत नसल्याने सूतचा स्टॉक देखील पडून आहे. त्यामुळे भावात वाढ होत नाही. अनेक जिनर्सचे पेमेंट देखील थांबविण्यात आले असून, त्यामुळे जिनर्सकडून देखील कापूस खरेदीस टाळाटाळ केली जात आहे. मात्र, ज्या शेतकºयांना पैशांची आवश्यकता आहे. असेच शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणत आहेत.
अमेरिका व चिनच्या ट्रेडवार मध्ये चीनकडून भारतातील कापूस खरेदी केला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, चीनने भारताकडून आपला माल न घेता ब्राझीलला जास्त प्राधान्य दिले आहे. चीनने ब्राझीलकडून गेल्या वर्षाच्या तूलनेत तब्बल ३०० टक्कयांनी जास्त कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा फटका भारताच्या निर्यातीवर बसत आहे.
सध्याची आंतरराष्टÑीय बाजाराची स्थिती पाहता कापसाच्या दरात कुठलीही वाढ होणे सध्या तरी शक्य नाही. तसेच शेतकºयांकडून देखील अद्यापही कापूस विक्रीसाठी आणला जात नाही. आतापर्यंत खान्देशात ७ ते ८ लाख गाठींचे उत्पादन झाले असून, शेतकºयांकडे सुमारे ६० टक्के कापूस शिल्लक आहे.
-हर्षल नारखेडे, संचालक, हर्षल कॉटन, आव्हाणे