आज पाणी पुरवठा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:16 AM2020-12-24T04:16:04+5:302020-12-24T04:16:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - वाघुर पाणी पुरवठा योजनेतंर्गत शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसीमधील बीएएसएन कार्यालयाजवळील व मानराज मोटर्स ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - वाघुर पाणी पुरवठा योजनेतंर्गत शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसीमधील बीएएसएन कार्यालयाजवळील व मानराज
मोटर्स समोरील १५०० मीमी व्यासाच्या पाईन लाईनवर गळती दुरुस्तीचे काम मनपाने हाती घेतले आहे. यासह वाघुर पंपीग स्टेशन येथील
५०० अश्वशक्ती पंपाच्या दुरुस्तीचे काम देखील हाती घेण्यात आल्यामुळे शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.
त्यामुळे गुरुवारी शहरात पाणी पुरवठा होणार नसून, शुक्रवारी पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती मनपा पाणी पुरवठा विभागाकडून
देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमृत योजनेच्या कामांमुळे जुन्या पाईप-लाईन फुटणे, व्हॉल्व फुटणे अशा कारणांमुळे गल्लीबोळात पाण्याचा समस्या निर्माण होत आहेत. त्यातच आता मनपा पाणी पुरवठा विभागाने दुरुस्तीचे कामे हाती घेतल्याने जळगावकरांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे. दुरुस्तीचे काम संपल्यानंतर तत्काळ टाक्या भरून दुसऱ्या दिवसाच्या पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल अशी माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
शुक्रवारी या भागात होईल पाणी पुरवठा
वाल्मीक नगर, कांचन नगर, दिनकर नगर, आसोदा रोड, मोहननगर, नेहरू नगर, हरीविठ्ठल, पिंप्राळा गावठाण, गायत्रीनगर. नुतन वर्षा कॉलनी, शारदा कॉलनी, दांडेकर नगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलीस कॉलनी, खोटेनगर, गेंदालाल मील, शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, योगेश्वर नगर, गणपती नगर, आदर्शनगर, राका पार्क, शिवकॉलनी, पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगर, तांबापुरा.