पु्न्हा पाईपलाईन फुटल्याने आज पाणी पुरवठा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:45 AM2021-01-08T04:45:37+5:302021-01-08T04:45:37+5:30

घरपट्टी ५० टक्के माफ करा जळगाव -मनपात सत्ताधारी भाजपने ५० टक्के घरपट्टी माफीचा ठराव केला. मात्र, हा ठराव नेहमीप्रमाणे ...

There is no water supply today due to pipeline rupture | पु्न्हा पाईपलाईन फुटल्याने आज पाणी पुरवठा नाही

पु्न्हा पाईपलाईन फुटल्याने आज पाणी पुरवठा नाही

Next

घरपट्टी ५० टक्के माफ करा

जळगाव -मनपात सत्ताधारी भाजपने ५० टक्के घरपट्टी माफीचा ठराव केला. मात्र, हा ठराव नेहमीप्रमाणे गाजर दाखवण्यात आहे. हा ठराव म्हणजे राज्यातील महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठीचा ठराव असून, महापौरांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवून जळगाव मनपातील ५० टक्के घरपट्टी माफ करून आणावी अशा मागणीचे पत्र शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी महापौर भारती सोनवणे यांना दिले आहे. भाजपची सत्ता असलेल्या एकाही राज्यातील शहरांमध्ये घरपट्टी माफ झालेली नाही. तर महाविकास आघाडीकडून तशी अपेक्षा का ठेवली जात आहे ? असा प्रश्न मालपुरे यांनी उपस्थित केला आहे. केंद्राकडून ठराव मंजूर करून आणला तर शिवसेनेकडून महापौरांचा जाहीर सत्कार करण्यात येईल असेही मालपुरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

अखर्चित निधीबाबत मनपात आज बैठक

जळगाव : अमृत योजनेतंर्गत अपार्टमेंटला नळ कनेक्शन देणे, घरपट्टीवरील शास्तीबाबत अभय योजना राबविणे व २५ कोटींपैकी अखर्चीत निधीबाबत नियोजन ठरविण्यासाठी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी मंगळवारी ११ वाजता मनपात बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक नितीन लढ्ढा यांच्यासह मनपातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

त्या दुकानदारांना मनपाने बजावली नोटीस

जळगाव - शहरातील बी.जे.मार्केट भागात ‘नेकी की दिवार’ च्या नावाखाली अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या दुकानांबाबत मनपाने दुकानदारांना दोन दिवसात आपले साहित्य काढून दुकाने काढून घेण्याबाबत नोटीस बजावली आहे. ‘लोकमत’ ने २ रोजीच्या अंकात याठिकाणच्या अतिक्रमणाबाबत वृत्त प्रकाशित केले होते. याच वृत्ताची दखल घेत मनपा प्रशासनाने दुकानदारांना नोटीस बजावली असून, दोन दिवसात स्वत: हुन दुकाने काढून न घेतल्यास मनपाकडून थेट कारवाई करण्यात येणार आहे.

शिवसेना महानगर व साहस फाउंडेशन तर्फे महिलांना साड्या वाटप

जळगाव - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शिवसेना जळगाव महानगर व साहस फाउंडेशन यांच्या वतीने शहरातील सफाई महिला कर्मचारी यांचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सरिता कोल्हे यांनी सर्व महिलांना हळदी कुंकूवाच वाण व साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला व कोरोना काळात ज्या शासकीय नोकरी करणाऱ्या महिलनांचा ही कोरोना योद्धा म्हणून सत्कार ही करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख ,महानंदा पाटील, महिला महानगरप्रमुख शोभा चौधरी, मंगला बारी, सरिता कोल्हे, अंकुश कोळी, उपमहानगर प्रमुख नितीन सपके, प्रवीण पटेल, गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर, पूनम राजपूत, दीपक कुकरेजा, शंतनू नारखेडे, अॅड. अभिजित रंधे, संतोष पाटील, मोसीन शेख आदी उपस्थित होते.

Web Title: There is no water supply today due to pipeline rupture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.