टाकळी प्र.चा.भागात १० दिवसांपासून पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 10:08 PM2019-10-11T22:08:21+5:302019-10-11T22:09:54+5:30

टाकळी प्र.चा. भागात गेल्या १० दिवसांपासून पिण्याचे पाणी न आल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

There is no water in the tank area for 3 days | टाकळी प्र.चा.भागात १० दिवसांपासून पाणी नाही

टाकळी प्र.चा.भागात १० दिवसांपासून पाणी नाही

Next
ठळक मुद्दे१० हजार लोकवस्तीसणासुदीतही हालग्राम पंचायतीने त्वरित पाणीपुरवठ्याचे नियोजन करून सुरळीत करावा५० रुपये तासाने विकत घ्यावे लागतेय पाणी

चाळीसगाव, जि.जळगाव : शहराच्या पूर्वेला असणाऱ्या भडगाव रोडलगतच्या टाकळी प्र.चा. भागात गेल्या १० दिवसांपासून पिण्याचे पाणी न आल्याने नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसात परिसरातील लोकांना पिण्याचे पाणी घेण्यासाठी भटकावे लागत आहे. ग्रामपंचायतीचे नियोजन नसल्याची तक्रार याभागातील रहिवाशांनी केली आहे.
टाकळी प्र.चा.हा भाग शहरालगतच असल्याने १० हजारांहून अधिक लोकवस्ती या भागात वास्तव्यास आहे. नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. नळांना गेल्या १० दिवसात एकदाही पाणी न आल्याने त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
११ वर्षांनंंतर यंदा प्रथमच गिरणा धरण ओव्हर फ्लो झाले. टाकळी प्र.चा. गावाची रहिपुरी लगत गिरणा नदीत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहे. नदी धो धो वाहत असतानाही टाकळी प्र.चा.भागात पाण्याचा ठणठणाट आहे.
परिसरात सार्वजनिक विहिरी व कूपनलिका नसल्याने रहिवाश्यांना थेट शहरात विकतचे पाणी आणण्यासाठी धाव घ्यावी लागते. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने पाणी टंचाईच्या समस्येला महिला वर्गाला तोंड द्यावे लागत आहे. ग्राम पंचायतीने त्वरित पाणीपुरवठ्याचे नियोजन करून तो सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
५० रुपये तासाने विकत घ्यावे लागतेय पाणी
चाळीसगाव शहराला लागूनच असलेल्या टाकळी प्र. चा. हा शहरी भागाप्रमाणे सधन भाग आहे. असे असतानाही गेल्या १० ते १२ दिवसांपासून ग्रामपंचायतीतर्फे पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. नागरिकांना अक्षरश: ५० रुपये तासप्रमाणे बोअरींग मालकांकडून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. यामुळे नागरिकांतर्फे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: There is no water in the tank area for 3 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.