क्षणात होत्याचे नव्हते झाले, मालगाडीच्या टपावर चढलेल्या तरूणाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 12:17 PM2020-01-07T12:17:32+5:302020-01-07T12:18:09+5:30
मित्रांसोबत आला होता लघुशंकेसाठी
जळगाव : नवीन बजरंग बोगद्यावर उभ्या असलेल्या इंधन वाहून नेणाऱ्या मालगाडीच्या टपावर चढलेल्या तरूणाचा उच्चदाबाच्या वीजवाहक तारेला स्पर्श होवून मृत्यू झाल्याची दूर्दैवी घटना सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली़ योगेश गुलाब मराठे (२०, रा़ खोटेनगर परिसर, जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे़ योगेश हा दोन मित्रांसोबत लघुशंकेसाठी रेल्वे रूळाजवळ आला असता तेव्हा ही घटना घडली असल्याचे सांगण्यात आले़
योगेश हा खोटेनगर परिसर आई-वडीलांसह वास्तव्यास होता़ सोमवारी रात्री योगेश हा मित्र विशाल यादव आणि नीलेश घाटे यांच्यासोबत घराबाहेर दुचाकीने फिरण्यासाठी आला होता़ रात्री ८ वाजेच्या सुमारास तिघेही पिंप्राळा रस्त्यावरील बजरंग बोगद्याजवळील रेल्वे रूळाजवळ लघुशंकेसाठी आले होते. त्यावेळी इंधन वाहून नेणारी मालगाडी उभी होती़ योगेश हा मालगाडी ओलांडून दुसºया दिशेने गेला़ त्यानंतर तो मालगाडीवर चढला असता त्याचा अचानक तोल गेला आणि रेल्वेच्या उच्चदाबाच्या तारेला त्याचा स्पर्श झाला़ अन् काही क्षणातचं मोठा आवाज होवून योगेश गतप्राण झाला.
मित्रांनी घेतली धाव
स्फोटासारखा आवाज झाला़ त्यामुळे विशाल आणि नीलेश या दोघांनी मालगाडीच्या दिशेने धाव घेतली़ तर दोघांना योगेश हा संपूर्ण भाजलेला मृत अवस्थेत दिसून आला़ मित्राला मृत पाहून त्यांनी त्वरित पुलाच्या खाली धाव घेतली आणि नागरिकांना घटनेची माहिती दिली़