गैरव्यवहाराची चौकशी लागली

By Admin | Published: February 25, 2016 12:20 AM2016-02-25T00:20:13+5:302016-02-25T00:20:13+5:30

सर्व शिक्षा अभियानातील 53 लाखांच्या खर्चात अफरातफर झाल्याच्या आरोपावरून शिक्षण विभागाच्या अवर सचिवांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

There was a problem of fraud | गैरव्यवहाराची चौकशी लागली

गैरव्यवहाराची चौकशी लागली

googlenewsNext

जिल्ह्यातील सर्व शिक्षा अभियानातील गैरव्यवहाराची मालिका सुरूच आहे. शिक्षण महोत्सवातील कार्यक्रमांवर झालेल्या 53 लाखांच्या खर्चात अफरातफर झाल्याच्या आरोपावरून शिक्षण विभागाच्या अवर सचिवांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत जिल्ह्यात गैरव्यवहार झाल्याचे यापूर्वी उघडकीस आल्याने काही जणांना निलंबित, तर काही जणांना बडतर्फ केले आहे. हा अनुभव पाठीशी असताना पुन्हा या अभियानाअंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमात गैरव्यवहाराच्या तक्रारी सुरूच आहेत.

या पाश्र्वभूमीवर शिक्षण महोत्सवावर झालेल्या 53 लाखांच्या खर्चात गैरव्यवहार झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते नीलेश लोहार यांनी शिक्षण सचिव नंदकुमार यांच्याकडे केली होती. यावर विभागाचे अवर सचिव बी.आर. माळी यांनी याप्रकरणी तातडीने चौकशी करून अहवाल पाठविण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण परिषदेला दिले आहेत.

स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करण्यात येईल. मुख्य कार्यकारी अधिका:यांच्या सूचनेनुसार चौकशीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

-डॉ.राहुल चौधरी,

प्राथमिक शिक्षणाधिकारी.

Web Title: There was a problem of fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.