एरंडोल येथे अचानक कार पेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 09:45 PM2018-11-22T21:45:36+5:302018-11-22T21:48:52+5:30

जि.प.बांधकाम उपविभागाच्या कार्यालयाच्या आवारात लावलेल्या चारचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना गुरूवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.

There was a sudden car in Erandol | एरंडोल येथे अचानक कार पेटली

एरंडोल येथे अचानक कार पेटली

googlenewsNext
ठळक मुद्देएरंडोल पोलिसात झाली आगीची नोंदशॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

एरंडोल : येथे जि.प.बांधकाम उपविभागाच्या कार्यालयाच्या आवारात लावलेल्या चारचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना गुरूवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. बॅटरीचा शॉर्टसर्किंट झाल्यामुळे डाव्या बाजुकडील चालक सीट, दरवाजे व चाके पूर्णपणे जळाले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ झाली. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात आग म्हणून नोंद आहे.
एरंडोल येथील बांधकाम उपविभाग कार्यालयातील शाखा अभियंता सुरेंद्र हिरामण पाटील हे आवारात त्यांची चारचाकी क्र. (एम.एच.१८ ए.जे.९४३२) उभी करून कार्यालयात कामकाजासाठी गेले असता. दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक अलार्म सिस्टीम वाजू लागल्याने त्यांचा गाडीचालक अमोल विठ्ठल लंगोरे (रा.चंपाबाग, धुळे) हा जवळ गेला. गाडीच्या डाव्या बाजूने धुर निघत असल्याचे लक्षात आले व चालक सीट, दरवाजे, चाके जळत असताना दिसले. या गाडीचा अर्धा भाग पेटला. कार्यालयातील कर्मचाºयांनी पाणी टाकून आग विझवली.
या घटनेची माहिती एरंडोल पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. सहाय्यक फौजदार नारायण पाटील व नीलेश ब्राह्मणकर हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: There was a sudden car in Erandol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.