चॉपर बाळगून माजवित होता दहशत, पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या
By सागर दुबे | Updated: May 3, 2023 22:57 IST2023-05-03T22:56:16+5:302023-05-03T22:57:01+5:30
च्याजवळून चॉपर जप्त करण्यात आला आहे.

चॉपर बाळगून माजवित होता दहशत, पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या
जळगाव : एमआयडीसीतील के सेक्टरमधील एच.डी.फायर कंपनीजवळ लोखंडी चॉपर घेवून फिरणा-या रॅकार्डवरील गुन्हेगार शैलेश शंकर चौधरी (१९, रा.सम्राट कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. त्याच्याजवळून चॉपर जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी रात्री ९ वाजता झाली.
शैलेश चौधरी याच्याविरद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न याबाबत देखील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बुधवारी रात्री ९ वाजता तो एमआयडीसीतील के सेक्टरमधील एच.डी.फायर कंपनीजवळ फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्याजवळ चॉपर मिळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी त्याच्याविरूद्ध आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, किशोर पाटील, इमरान सैयद, योगेश बारी, मुकेश पाटील, किरण पाटील, छगन तायडे आदींनी केली आहे.