कोविड रुग्णालयातून १३७ रुग्ण झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 12:30 PM2020-07-14T12:30:24+5:302020-07-14T12:30:37+5:30

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून आठवडाभरात १३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे़ ही एक मोठी दिलासादायक ...

There were 137 patients from Kovid Hospital | कोविड रुग्णालयातून १३७ रुग्ण झाले

कोविड रुग्णालयातून १३७ रुग्ण झाले

Next

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून आठवडाभरात १३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे़ ही एक मोठी दिलासादायक बाब असून गंभीरावस्थेतील हे रुग्ण बरे झाल्याचे चित्र आहे़ दरम्यान, सोमवारी शहरात ५६ नवे रुग्ण आढळल्याची नोंद असून २४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे़
ज्या रुग्णांना मध्यम लक्षणे असतात किंवा ज्यांची प्रकृती अत्यवस्थ असते, अशा रु्णंना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येत असते़ अशा रुग्णांचेही बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून कोविड रुग्णालयातील हे प्रमाण समाधानकारक असल्याच चित्र समोर येत आहे़ सरासरी १९ रुग्ण रोज बरे होऊन घरी जात असल्याचे या आठवडाभराच्या आकडेवारीवरून समोर येत आहे़ कोविड रुग्णालयाची प्रतिमा दिवसेंदिवस बदलत असल्याचे चित्र आहे़
शहराची रुग्णसंख्या १४७६
शहरातील अयोध्यानगरसह अनेक भागांमध्ये पुन्हा रुग्ण आढळून आले आहेत़ त्यात विसनजीनगर, धनाजीनाना नगर या नवीन भागातही रुग्ण आढळून आले आहेत़ शहराची रुग्णसंख्या १४७६ झाली असून त्यापैकी ८०१ रुग्ण बरे झालेले आहेत़

गणपती रुग्णालयात येत्या दोन दिवसात ‘सिव्हील’
नॉन कोविड रुग्णांची उपचारांसाठी होणारी कसरत व त्यांचे होणारे हाल थांबविणे मोठे आव्हान प्रशासनासमोर असून आता गणपती रुग्णालय येत्या एक -दोन दिवसात नॉन कोविड रुग्णांसाठी सेवेत असेल. या रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांनी दिली़ जिल्ह्यात कोविडचे रुग्ण वाढले त्या रुग्णांच्या व्यवस्थेत नॉन कोविड रुग्णांकडे प्रचंड दुर्लक्ष झाल्याचा प्रकार वारंवार समोर आला आहे़ अनेकांचे उपचाराअभावी जीव गेल्याचेही आरोप झाले आहेत़ अशा स्थितीत शहरात जिल्हा रुग्णालयच नसणे ही गंभीर बाब असून यावर लोकप्रतिनिधींकडूनही वारंवार मागणी व आरोप झाले आहेत़ मात्र, तरीही ही यंत्रणा सुरळीत होत नसल्याचे चित्र आहे़ अखेर गणपती रुग्णालयातून कोविडचे रुग्ण हलवून आता या ठिकाणी नॉन कोविड रुग्णांसाठी अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे़

आयुर्वेदीक महाविद्यलयाही असेल सेवेत
गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात असलेले आयुर्वेदीक महाविद्यालयात शंभर बेड हे सिव्हीलसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ या ठिकाणचे काही किरकोळ कामे झाल्यानंतर हे रुग्णालयही नॉन कोविडसाठी दोन ते तीन दिवसात सेवेत येईल, अशी माहिती आहे़

सोमवारी या भागात आढळले रुग्ण
नशेमन कॉलनी २, धनाजी नाना नगर १, गायत्री नगर १, विसनजीनगर १, सुप्रिल कॉलनी १, वाघनगर ४, सालारनगर १, पिंप्राळा हुडको ४, खंडेराव नगर २, भास्कर मार्केट १, अयोध्यानर ३, सिंधी कॉलनी ३, शनिपेठ१, इंद्रप्रस्थनगर १, मेहरूण १, जुनेजळगाव १, शिवाजी नगर १, गणेश कॉलनी १, पिंप्राळा ३, दादावाडी २, एमआयडीसी १, भगीरथ कॉलनी ४, रामेश्वर कॉलनी ५, वाल्मिकनर १, एम़ जे़ कॉलेज परिसर ३, शनिपेठ १

औषधी सुरू करण्याबाबत टास्कफोर्सची विनंती
जळगाव : रिटोनाविर व लोपीनावीर ही दोन औषधे स्वस्त तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. सौम्य लक्षणे असलेल्यांच्या उपचारामध्ये ती वापरण्यात यावी, अशी मागणी टास्कफोर्सतर्फे करण्यात आली असून याविषयी सदस्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन पत्रही दिले़

Web Title: There were 137 patients from Kovid Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.