कोव्हॅक्सिनचे २३०० डोस आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:16 AM2021-05-16T04:16:08+5:302021-05-16T04:16:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोव्हॅक्सिन लसीचे जिल्ह्यासाठी २३०० डोस प्राप्त झाले असून यात ४५ वर्षावरील नागरिकांसाठीच्या दुसऱ्या डोससाठी ...

There were 2300 doses of covacin | कोव्हॅक्सिनचे २३०० डोस आले

कोव्हॅक्सिनचे २३०० डोस आले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोव्हॅक्सिन लसीचे जिल्ह्यासाठी २३०० डोस प्राप्त झाले असून यात ४५ वर्षावरील नागरिकांसाठीच्या दुसऱ्या डोससाठी हे सर्व डोस राखीव ठेवण्यात आले असून यात शहरातील स्वाध्याय भवन व रोटरी भवनात कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबविण्यात आले असून उपलब्ध होणाऱ्या लसींमध्ये दुसऱ्या डोसचेच नियोजन केले जात आहे. मात्र, त्यातही आता कोविशिल्ड लसीच्या दोन डोस मधील अंतर वाढविण्यात आल्याने लसीकरणच्या केंद्रांवरील गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे लसीच्या उपलब्धतेनुसार पहिला डोसही दिला जात आहे.

या केंद्रांवर कोविशिल्ड

शाहू महाराज रुग्णालय, नानीबाई रुग्णालय, शिवाजीनगरातील डी. बी. जैन रुग्णालय, मास्टर कॉलनीतील मुलतानी हॉस्पिटल, शाहीर अमरशेख हॉस्पिटल. या केंद्रांवर कोविशल्डच्या दुसऱ्या डोसला, हेल्थ वर्ककर आणि फ्रंटलाईन वर्करच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य राहणार असून लसीच्या उपलब्धतेनुसार पहिला डोस दिला जाणार आहे.

या केंद्रांवर कोव्हॅक्सिन

गणपतीनगरातील स्वाध्याय भवन, मायादेवीनगरातील रोटरी भवन या ठिकाणी कोव्हॅक्सिनचा केवळ दुसरा डोस दिला जाणार आहे.

कोव्हॅक्सिन कुठे किती

जामनेर उपजिल्हा रुग्णालय १००, मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय १०, ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव १००, ग्रामीण रुग्णालय पारोळा १९०, भडगाव ११०, यावल १००, ग्रामीण रुग्णालय रावेर १००, बोदवड १०, एरंडोल ४०, रेल्वे हास्पीटल भुसावळ १००, बद्री प्लॉट भुसावळ २००, जळगाव ७००, पाल ग्रामीण रुग्णालय ५०, पिंपळगाव ग्रामीण रुग्णालय ११०, ग्रामीण रुग्णालय पहूर १००, अमळनेर प्राथमिक आरेाग्य केंद्र १००, ग्रा. रु. सावदा १५०, ग्रा रु वरणगाव २००

Web Title: There were 2300 doses of covacin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.