रेमडेसिविरचे आज १३०० इंजेक्शन येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:15 AM2021-04-13T04:15:15+5:302021-04-13T04:15:15+5:30
लोकमत न्यू नेटवर्क जळगाव : रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा कमी आहे. शासकीय यंत्रणा वगळता खासगीत मात्र, या इंेक्शनबाबत परिस्थिती बिकटच ...
लोकमत न्यू नेटवर्क
जळगाव : रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा कमी आहे. शासकीय यंत्रणा वगळता खासगीत मात्र, या इंेक्शनबाबत परिस्थिती बिकटच आहे. सोमवारी ५३० इंजेक्शन प्राप्त झाले तर मंगळवारी पुन्हा १३६० रेमडेसिविर इंजेक्शन येणार आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पाठपुराव्यानंतर हे १३६० इंजेक्शन देण्याचे आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहे.
मंगळवारी सकाळी हे इंजेक्शन जिल्ह्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे. या आधीही प्रशासनाकडून जिल्ह्याला तीन हजार इंजेंक्शन देण्यात आले हेाते.
मागणीच्या दहाच टक्के पुरवठा
जिल्ह्यात ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या ही अडीच हजाराच्या आसपास असून इंजेक्शनची रोजची मागणी मात्र, ५ हजारांवर पोहचली आहे. यात अनेक खासगी डॉक्टरांकडे निकष न पाळता रेमडेसिविरचा वापर होत असल्याने मागणी अधिक असून त्याच्या केवळ दहाच टक्के पुरवठा होत असल्याची माहिती औषध निरीक्षक डॉ. अनिल माणिकराव यांनी दिली. त्यामुळे तुटवड्याची परिस्थिती कायम आहे.
शासकीय यंत्रणेला तारले
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जेव्हा रुग्णांची संख्या कमी झाली होती, त्यावेळी पुरेसा साठा होता. मात्र, तेव्हा वापर कमी झाल्यानंतर आता तो साठा उपयोगात येत आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेत पुरेसे इंजेक्शन आहेत. सर्रास वापर न करता निकषात इंजेक्शन वापरले तर तुटवडा भासणार नाही, असेही सांगितले जात आहे.