प्रभात चौकाच्या बाजूने होणार संपूर्ण डांबरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:13 AM2021-04-03T04:13:05+5:302021-04-03T04:13:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण केले जात आहे. त्यासोबतच आजूबाजूच्या रस्त्यांना जोडणारा रस्तादेखील महामार्ग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण केले जात आहे. त्यासोबतच आजूबाजूच्या रस्त्यांना जोडणारा रस्तादेखील महामार्ग प्राधिकरण बनवून देत आहे. मात्र सध्या प्रभात चौकात फक्त पाच मीटर रुंदीचा लहान रस्ता बनवण्यात आला होता. हा रस्ता लवकरच पूर्ण केला जाणार असून, महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यापर्यंत त्याचे डांबरीकरण होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे देण्यात आली आहे.
या ठिकाणी सध्या डांबरी रस्त्याच्या बाजूला भाजी बाजार भरतो. जर रस्ता लहान केला तर अतिक्रमण करणाऱ्यांची संख्या या ठिकाणी वाढत आहे. सध्या पाच ते साडेपाच मीटरचाच लहान रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे येथे भविष्यातदेखील अतिक्रमण होऊ शकेल, अशी भीती नागरिक व्यक्त करीत होते. मात्र हा रस्ता लवकरच पूर्ण केला जाणार असून, थेट पुतळ्यापर्यंत डांबरीकरण केले जाणार आहे. तसेच महामार्ग आणि शहरातील इतर रस्त्यांना जोडले जाणारे लहान रस्तेदेखील महामार्ग प्राधिकरणाकडून लवकरच पूर्ण केले जाणार आहेत. सध्या होळीमुळे महामार्गाचे काम मंदावले आहे. मजूर कामावर परतल्यावर तातडीने जोडणारे रस्ते तयार केले जातील, असेही महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितले.