शौचालयात कोणीतरी असेल.. दरवाजा कसा ठोठावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:54 AM2020-06-12T11:54:55+5:302020-06-12T11:55:47+5:30

गृहीत धरणे महिलेच्या जीवावर : स्वच्छतागृहे तपासली मात्र, वरच्यावर

There will be someone in the toilet .. how to knock on the door | शौचालयात कोणीतरी असेल.. दरवाजा कसा ठोठावणार

शौचालयात कोणीतरी असेल.. दरवाजा कसा ठोठावणार

Next


जळगाव : महिला बेपत्ता झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी स्वच्छतागृहे तपासली होती मात्र, बंद असलेल्या शौचालयात कुणीतरी दुसरा रुग्ण असेल हे गृहीत धरण्यात आल्याने तो दरवाजाच कोणी ठोठावला नाही व अखेर काही दिवसांनी दुर्गंधी आल्यानंतर बेपत्ता महिलेचा मृतदेह हाती लागला़ हा गंभीर प्रकारही काही कर्मचाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर समोर आला आहे़
महिला बेपत्ता झाली त्यावेळी शौचालये तपासण्यात आली होती़ त्यावेळी महिला त्या ठिकाणी नव्हती, ती नंतर आली असेल, असा दावा काही कर्मचाºयांनी केला आहे़ दुसरीकडे काही अधिकाºयांनी चार ते पाच दिवसांपूर्वी दरवाज्यांच्या कामासाठी शौचालयांची पाहणी केली होती़ मात्र, पहिल्या शौचालयाचा दरवाजा बंद असल्याने कुणीतरी रुग्ण असेल, असे गृहीत धरून कुणीच दरवाजा ठोठावला नव्हता, अन्य कर्मचाºयांच्या बाबतीतही असाच प्रकार झाल्याचे बोलले जात आहे़ दरम्यान, कक्ष ७ कडे जात असताना एक सुरक्षा रक्षक समोर बसलेले होते़ त्यांनी विचारणा केली़ त्यानंतर मात्र, पुढे कसलीही सुरक्षा आढळून आली नाही़

पहूरचा संशयित रुग्ण गेला निघून
कोविड रुग्णालयाची परिस्थिती व उपचार नसल्याच्या तक्रारी वाढत असल्याचे चित्र आहे़ एका वृद्ध महिलेच्या धक्कादायक मृत्यू प्रकरणाला एक दिवस उलटत नाही तोच पहूर येथील एक संशयित रुग्ण कोविड रुग्णालयाच्या परिस्थितीला घाबरून थेट निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़ यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली होती़ मात्र, यंत्रणेने तात्काळ तपास करून या रुग्णाला पहूर येथेच दाखल केल्याचे वृत्त आहे़

हायरिस्क कॉन्टॅक्ट वाºयावर
बाधितच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क कॉन्टॅक्टची केवळ नोंद केली जात असून तपासणी होत नसल्याचा प्रकार सुरू असल्याबाबत दीपककुमार गुप्ता यांनी अधिष्ठाता डॉ़ खैरे यांना माहिती दिली़ मात्र, त्यांनी ऐकून घेतले नाही़

पन्नास पावलांवर शौचालय
महिला दाखल असलेला कक्ष व स्वच्छतागृह अगदीच पन्नास पावलांचे अंतर आहे़ या ठिकाणी असलेल्या शौचालयांमधील अगदीच पहिल्याच शौचालयात महिलेचा मृतदेह आढळून आला़ या ठिकाणी बाधित रुग्णांची नेहमीच ये-जा असते तरीही हा गंभीर प्रकार समोर का आला नाही याबाबत असंख्य प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत़ दरम्यान, बुधवारीही पाहणी करीत असताना वैद्यकीय अधीक्षक डॉ़ किरण पाटील यांना दुर्गंधी आल्यानंतर या शौचालयाचा दरवाजा तोडून मग महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला़

Web Title: There will be someone in the toilet .. how to knock on the door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.