अमळनेरात व्यापाऱ्यांकडून पालिकेला थर्मल गन व आॅक्सिमीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 06:04 PM2020-10-01T18:04:53+5:302020-10-01T18:06:29+5:30

व्यापाºयांनी पालिकेला आॅक्सिमीटर व थर्मल गन दिले आहेत.

Thermal guns and oximeters from traders in Amalnera | अमळनेरात व्यापाऱ्यांकडून पालिकेला थर्मल गन व आॅक्सिमीटर

अमळनेरात व्यापाऱ्यांकडून पालिकेला थर्मल गन व आॅक्सिमीटर

Next
ठळक मुद्देकोरोना नियंत्रणासाठी पालिकेसाठी व्यापाऱ्यांचा पुढाकारप्रांताधिकारी सीमा अहिरे व मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांच्याकडे साहित्य सुपूर्द

अमळनेर : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वीरित्या व मुदतीत राबवण्यासाठी व्यापारी संघटनेतर्फे अमळनेर नगरपालिकेला ५० आॅक्सिमीटर व ५० थर्मल गन मोफत देण्यात आले.
कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी शहरातील ५० वर्षांवरील नागरिकांची तपासणी करून त्यांना तातडीने उपचार करता यावेत म्हणून ५० पथकांमार्फत नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीस विलंब होऊ नये म्हणून व्यापारी संघटना मदतीला पुढे आली आहे. व्यापाºयांनी पालिकेला आॅक्सिमीटर व थर्मल गन दिले आहेत.
प्रांताधिकारी सीमा अहिरे व मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले. यावेळी पूनम कोचर, महेश कोठावदे, बिपीन कोठारी, मिलिंद डेरे, राजू वर्मा, मनीष जोशी, संजय चौधरी, आबा चौधरी उपस्थित होते.

Web Title: Thermal guns and oximeters from traders in Amalnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.