मुलीच्या घरी गेलेल्या दाम्पत्याच्या घरात चोरट्याला डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 07:51 PM2020-01-07T19:51:44+5:302020-01-07T19:52:33+5:30

श्रीनगरातील घटना : ३ लाख ५८ हजारांचा ऐवज लंपास ; कुलूप तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश ; सामान फेकले अस्ताव्यस्त

The thief in the couple's house who went to the girl's house | मुलीच्या घरी गेलेल्या दाम्पत्याच्या घरात चोरट्याला डल्ला

मुलीच्या घरी गेलेल्या दाम्पत्याच्या घरात चोरट्याला डल्ला

Next

जळगाव- अहमदनगर येथे मुलीच्या घरी कार्यक्रमानिमित्त गेलेले श्रीनगरातील रहिवासी उदय प्रल्हाद थोरात यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारीत सुमारे ३ लाख ५८ हजार ६५० रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
महाबळ परिसरातील श्रीनगरात उदय थोरात हे पत्नी अपर्णा यांच्यासह वास्तव्यास आहेत़ तर ते जैन व्हॅली येथे नोकरीला आहे़ ५ जानेवारी रोजी थोरात दाम्पत्य हे मुलीच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे अहमदनगर येथे गेलेले होते़ त्यामुळे घरी कुणीही नव्हते़ मात्र, ही संधी साधत चोरट्यांनी मध्यरात्री ग्रीलच्या दरवाज्याला असलेली साखळी व कुलूप तोडून चोरट्यांनी घरा प्रवेश केला़ त्यानंतर कपाटातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकडवर डल्ला मारून चोरून नेले़

लंपास झालेला ऐवज असा
चोरट्यांनी कपाटातून १ लाख १ हजार २५० रूपये किंमतीच्या ११ सोन्याच्या अंगठ्या, १ लाख २ हजार रूपयांच्या ४०़८ ग्रँक ९ सोन्याचे तुकडे, ३७ हजार ५०० रूपये किंमतीचे १५ ग्रँम वजनाचे १ सोन्याचा गौफ, ७ हजार ७५० रूपये किंमतीचे ३़१ ग्रँम वजनाचे सोन्याचे कर्णफूल, १२ हजार ४०० रूपयांचे ५ ग्रँम वजनाची सोन्याची चेन, ५९ हजार ५०० रूपये किंमतीचे २३़८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे २ मणीमंगळसूत्र, २४ हजार ७५० रूपये किंमतीचे ९़९ ग्रॅम वजनाचे १ सोन्याचा नेकलेस, ६ हजार २५० रूपये किंमतीचे २़५ ग्रँम वजनाची १ सोन्याची कानाची रिंग, ५ हजार १५० रूपये किंमतीचे ५१़५ ग्रँम वजनाचे १ जोड चांदीचे पैंजण, त्याचबरोबर २ हजार रूपयांची रोकड असा एकूण ३ लाख ५८ हजार ६५० रूपयांचा ऐवज लंपास केला आहे़

Web Title: The thief in the couple's house who went to the girl's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.