जळगावात चोरटय़ांना पकडले रंगेहाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2017 04:45 PM2017-06-07T16:45:47+5:302017-06-07T16:45:47+5:30

पोलिसांना रात्रीच्या गस्तीत सापडले चोरटे : एलईडी टिव्हीसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त

The thieves arrested in Jalgaon | जळगावात चोरटय़ांना पकडले रंगेहाथ

जळगावात चोरटय़ांना पकडले रंगेहाथ

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.7 - दौलतनगरमध्ये घरफोडी करुन निघालेल्या तिन चोरटय़ांना रामानंद नगर पोलिसांनी बुधवारी पहाटे साडे चार वाजता साहित्य लपविताना रंगेहाथ पकडले. राहुल काकडे, सागर गायकवाड, विशाल जाधव (  रा.समतानगर, जळगाव) असे चोरटय़ांचे नाव आहे.
पोलिसांनी या संशयितांकडून 26 हजार 800 रुपयांचा एलईडी, 1 हजार 200 रुपयांची इस्त्री, 800 रुपयांची तांब्या, पितळाची भांडी असा एकुण 28 हजार 800 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. तिघांविरुध्द चोरीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. चोपडा तालुक्यातील वड्री येथील रहिवाशी भरत शांताराम पाटील (वय 33) हे खाजगी नोकरी करतात. मोहाडी रस्त्यावरील दौलतनगरमध्ये ते कुटुंबासह वास्तव्याला आहेत. 2 जून रोजी ते घराला कुलुप लावून कुटुंबासह वड्री येथे गेले. बुधवारी पहाटे राहूल, सागर व विशाल या तिघांनी पाटील यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील एलईडी टिव्हीसह अन्य वस्तू लांबविल्या होत्या. मंगळवारी रात्रीच्या गस्तीवर असलेले रामानंदनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी तुषार विसपुते यांना तिन्ही जण नूतन वर्षा कॉलनीजवळील सौरभ टेंन्ट हाऊसजवळ तीन जण काहीतरी वस्तु लपविताना आढळले. त्यांनी तिघांची चौकशी केली असता त्यांच्याजवळ टॉमी, इस्त्री, कॅमेरा मिळून आला. चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याची खात्री झाल्याने त्यांना खाकी हिसका दाखविला असता त्यांनी भरत पाटील यांच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली.

Web Title: The thieves arrested in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.