मैत्रिणीच्या घरी जेवायला जाताच चोरट्यांनी बंद घर फोडले, सोने,चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास
By Ajay.patil | Published: May 14, 2023 04:54 PM2023-05-14T16:54:16+5:302023-05-14T16:54:28+5:30
घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यांनी आत प्रवेश करून पाहणी केली असताना घरातील सामान अस्तव्यस्त असलेले दिसून आला.
जळगाव - शहरातील खोटेनगर परिसरात असलेल्या हिराशिवा कॉलनीतील एक महिला मैत्रिणीच्या घरी जेवायला जाताच, शनिवारी महिलेचे बंद घर चोरट्यांनी फोडली. या घरातून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिन्यासह रोकड असा एकुण ३३ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी शनिवारी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील खोटे नगर परिसरात असलेल्या हिरा शिवा कॉलनीत नम्रता महावीर गादिया (वय-५०) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नम्रता गादिया या मैत्रिणीच्या घरी जेवणासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घर बंद करून कुलूप लावले. या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच १० हजारांची रोकड असा एकूण ३३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
दुपारी २ वाजता नम्रता गादिया घरी आल्या त्यावेळेस त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यांनी आत प्रवेश करून पाहणी केली असताना घरातील सामान अस्तव्यस्त असलेले दिसून आला. याप्रकरणी त्यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे करीत आहे. दरम्यान, भरदुपारी शहरात घरफोडीच्या घटना घडत असताना, पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. चोरट्यांवर पोलीसांचा कोणताही वचक नसल्याचेच या घटनेतून दिसून येत आहे