गुरे चोरणारी टोळी पकडली

By admin | Published: June 9, 2017 05:08 PM2017-06-09T17:08:38+5:302017-06-09T17:08:38+5:30

वरणगाव येथील नागरिकांची सतर्कता

The thieves caught the thieves | गुरे चोरणारी टोळी पकडली

गुरे चोरणारी टोळी पकडली

Next

 ऑनलाईन लोकमत

वरणगाव,दि.9 : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून गुरे चोरून नेत असताना नागरिकांच्या सतर्कतेमुळे गुरे चोरणा:या टोळक्यास पकडण्यास पोलिसांना यश मिळाले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील बैलजोडी शुक्रवारी भल्यापहाटे 1 वाजेच्या सुमारास त्याच्या जवळील चार चाकी (एम.एच.18 ए.ए.3533) या गाडीने शे.साजीद कुरेशी यांच्या मालकीची बैलजोडी चोरून नेण्याचा प्रयत्न करीत असताना बाजार समितीच्या आवारात झोपलेल्या लोकांना जाग आली. त्यांनी आरडा-ओरड केली असता चोरटय़ांनी त्यांच्यावर तुफान दगडफेक करीत पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु आरडा-ओरड झाल्याने आजुबाजूचे नागरीक ही बाजार समितीत धावत आल्याने चोरटय़ांचा प्रयत्न फसला़ दोघा बाजूने तुफान दगडफेक झाल्याने चोरटय़ांच्या गाडीचे नुकसान झाले. चोरटय़ांच्या टोळीतील रोशन मधुकर सोनवणे (रा.अंबिका नगर), मुश्ताक शे.हबीब (रा.वडजई, धुळे), शे.रऊ फ (बोरगाव सिल्लोड, औरंगाबाद) यांना पकडण्यात यश आले तर मनोज उर्फ मण्या (पुर्ण नाव माहिती नाही) रा.(एम.आय.डी.सी, जळगाव) पसार झाला़
शे.आसीम शे.बशीर यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The thieves caught the thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.