संरक्षक भिंतीच्या खाली खड्डा खोदून कंपनीत चोरट्यांचा प्रवेश, दीड लाखाचे साहित्य चोरी

By विलास.बारी | Published: May 4, 2023 07:56 PM2023-05-04T19:56:29+5:302023-05-04T19:56:59+5:30

या प्रकरणी गुरूवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thieves entered the company by digging a pit under the protective wall, stealing materials worth one and a half lakh | संरक्षक भिंतीच्या खाली खड्डा खोदून कंपनीत चोरट्यांचा प्रवेश, दीड लाखाचे साहित्य चोरी

संरक्षक भिंतीच्या खाली खड्डा खोदून कंपनीत चोरट्यांचा प्रवेश, दीड लाखाचे साहित्य चोरी

googlenewsNext

जळगाव : संरक्षक भिंतीच्या खाली खड्डा खोदून चोरट्यांनी एमआयडीसीतील एच.डी.प्रोटेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये प्रवेश करून दीड लाख रूपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुरूवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एच.डी.प्रोटेक्ट कंपनीमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून मोहन बलवत कुलकर्णी हे कामाला आहेत. बुधवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास कंपनीत फेरफटका मारत असताना त्यांना फाँड्री विभागातील व्यवस्थापक ए.कुमारेशन यांनी सांगितले की, १ लाख ३२ हजार ३०० रूपये किंमतीचे मिडल एल्बो कास्टींग आणि १३ हजार रूपये किंमतीचे एनगॉट ब्राँझ धातूच्या दोन पट्टया गायब झाल्या आहेत. त्यानंतर कुलकर्णी यांच्यासह इतर सहका-यांनी कंपनी व कंपनीच्या आवारामध्ये गायब झालेल्या साहित्यांचा शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नाही. त्यावेळी त्यांना कंपनीच्या पूर्व बाजूच्या संरक्षक भिंतीच्या खाली खड्डा खोदलेला दिसला. या माध्यमातून चोरट्यांनी कंपनीमध्ये प्रवेश करीत साहित्य चोरी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Thieves entered the company by digging a pit under the protective wall, stealing materials worth one and a half lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.