चोरट्यांनी लांबविलेला ट्रक सापडला ‘जीपीएस’ यंत्रणेद्वारे सहा तासात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 10:44 PM2018-03-10T22:44:28+5:302018-03-10T22:44:28+5:30

अजिंठा चौक परिसरातून चोरी गेलेल्या ट्रकचा शोध ‘जीपीएस’ या तंत्रज्ञानामुळे अवघ्या सहा तासात सापडला, मात्र चोरट्याला कुणकुण लागताच नांदूरा शहराजवळ ट्रक सोडून चोरट्याने पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द शनिवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thieves found a long tracked truck | चोरट्यांनी लांबविलेला ट्रक सापडला ‘जीपीएस’ यंत्रणेद्वारे सहा तासात

चोरट्यांनी लांबविलेला ट्रक सापडला ‘जीपीएस’ यंत्रणेद्वारे सहा तासात

Next
ठळक मुद्देमालकाने केला पाठलाग  नांदूराजवळ ट्रक सोडून चोरट्याचे पलायन मध्यरात्री लांबविला ट्रक

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१०:  अजिंठा चौक परिसरातून चोरी गेलेल्या ट्रकचा शोध ‘जीपीएस’ या तंत्रज्ञानामुळे अवघ्या सहा तासात सापडला, मात्र चोरट्याला कुणकुण लागताच नांदूरा शहराजवळ ट्रक सोडून चोरट्याने पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द शनिवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अब्दुल रज्जाक अब्दुल मज्जीद सालार (रा.शनी पेठ, जळगाव) यांचा इदगाह कॉम्प्लेक्ससमोर एमको या नावाने ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. तेथे समोरच मोकळ्या जागेत तीन ट्रक लावलेले असतात, त्यापैकी चालक बशीरोद्दीन अब्दुल सत्तार (रा.बळीराम पेठ, जळगाव) या चालकाने ६ मार्च रोजी रात्री साडे आठ वाजता क्र.एम.एच.१९ झेड.२६९२ हा ट्रक देखील त्या ठिकाणी लावण्यात आलेला होता. वॉचमन रशिद मोहम्मद तडवी याला ट्रकवर लक्ष ठेवण्याचे सांगून अब्दुल रज्जाक सालार व त्यांचा मुलगा शेख फारुख सालार हे दोन्ही जण घरी निघून गेले.
मध्यरात्री लांबविला ट्रक
मध्यरात्री अडीच वाजता ट्रक सुरु करुन कोणीतरी घेऊन जात असल्याचे लक्षात आल्यानंतर वॉचमनने मालकाला घटनेची माहिती दिली. ट्रकमध्ये जीपीएस प्रणाली बसवून त्याचे कनेक्शन फारुख सालार यांनी मोबाईलमध्ये घेतलेले असल्याने त्यांनी तत्काळ ही प्रणाली सुरु केली. त्यावेळी ट्रक महामार्ग सहाच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. 
ट्रकचा केला पाठलाग
फारुख सालार व अन्य सहका-यांनी कारद्वारे या ट्रकचा पाठलाग केला. जीपीएस प्रणाली ट्रकचे लोकेशन दाखवित असल्याने पाठलाग करणे सोपे झाले होते. या ट्रकला नांदूरा (जि.बुलडाणा) येथे कारने ओव्हरटेक केला. चालकास ट्रक थांबविण्याचा इशारा केला असता त्याने ट्रक थांबविला, मात्र पकडले जाण्याच्या भीतीने त्याने ट्रक सोडून शेतातून पळ काढला. यावेळी सालार यांनी नांदूरा येथून ट्रक जळगाव शहरात आणला. त्यानंतर शनिवारी चोरट्याविरुध्द तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Thieves found a long tracked truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.