मुलीच्या अभियांत्रिकी प्रवेशाच्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 08:59 PM2018-07-16T20:59:56+5:302018-07-16T21:01:45+5:30
मुलीच्या अभियांत्रिकी प्रवेशासाठी जमविलेले एक लाख २० हजार रुपये शिरीष प्रल्हाद पाटील यांच्या घरातून चोरट्यांनी लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी सहा वाजता इंद्रप्रस्थ नगरात उघडकीस आली. शिरीष पाटील हे पालिकेचे निवृत्त अधिकारी आहेत.
जळगाव : मुलीच्या अभियांत्रिकी प्रवेशासाठी जमविलेले एक लाख २० हजार रुपये शिरीष प्रल्हाद पाटील यांच्या घरातून चोरट्यांनी लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी सहा वाजता इंद्रप्रस्थ नगरात उघडकीस आली. शिरीष पाटील हे पालिकेचे निवृत्त अधिकारी आहेत. पाटील यांचे वडील पी.एस.पाटील (वय ९२) हे घरात झोपलेले असताना ही चोरी झाली आहे.
शिरीष प्रल्हाद पाटील, पत्नी मंगला पाटील व मुलगी चारु असे इंद्रप्रस्थ नगरात प्लॉट क्रमांक १० च्या गल्लीत राहतात. तर त्यांच्याच शेजारच्या घरात वडील पी.एस.पाटील हे राहतात. दोन्ही बाप-लेक हे नगरपालिकेत अधिकारी होते. ते निवृत्त झाले आहेत. शिरीष पाटील याच्या भाचीचे नाशिक येथे लग्न असल्याने संपूर्ण परिवार १४ रोजी नाशिक येथे गेलेला होता. वडील पी.एस.पाटील हे एकटेच घरी होते. त्यामुळे ते मुलाच्या घरीच राहत होते. सोमवारी सकाळी सहा वाजता झोपेतून उठल्यावर त्यांना पुढच्या हॉलमधील कपाट उघडे व त्यातील सामान अस्ताव्यस्त दिसला. त्यांनी घराची पाहणी केली असता मुलगा शिरीष यांच्या बेडरुममधील ही कपाट उघडे होते तर घराचा मागील दरवाजाही उघडा होता.