बैल थकल्यानंतर चोरट्यांनी सोडले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 04:49 PM2020-01-10T16:49:57+5:302020-01-10T16:50:37+5:30
चोरीस गेलेले चार बैल व बैलगाडी पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या तपास चक्रामुळे शिरपूरजवळील आमोदे येथे बैल थकल्याने रस्त्यावर सोडून दिल्याने बेवारस स्थितीत मिळाले.
कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : चोरीस गेलेले चार बैल व बैलगाडी पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या तपास चक्रामुळे शिरपूरजवळील आमोदे येथे बैल थकल्याने रस्त्यावर सोडून दिल्याने बेवारस स्थितीत मिळाले.
सूत्रांनुसार, ६ रोजी येथील सी.टी. पाटील नगरजवळील पप्पूू अमृतकर यांच्या शेतातून त्यांच्या मालकीचे चार बैल व एक बैलगाडी असा पावणेदोन लाख रुपये किमतीचे बैल व बैलगाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे शेतकरी व ग्रामस्थांत घबराट पसरली होती. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दिल्यानंतर भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी तपासाची चक्र फिरविली. याप्रमाणे मिळविलेल्या माहितीच्या आधारे पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील यांना योग्य त्या सूचना देत योग्य दिशेने तपासावर पाठविले. दि.९ रोजी दुपारी शिरपूरजवळील आमोदे येथे रस्त्याच्या कडेला बेवारस स्थितीत मिळाले. पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील यांच्यासह बैल व बैलगाडी मालक पप्पू अमृतकर, संदीप पाटील, भूषण पाटील हे तपासासाठी सोबत होते. दुपारी सदर बैल व बैलगाडी ट्रकद्वारे कजगाव येथे आणण्यात आले