चोरटे झाले अनलॉक! अमळनेरात तीन घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:20 AM2021-06-09T04:20:36+5:302021-06-09T04:20:36+5:30
अमळनेर : शासनाने अनलॉक करताच चोरटेही अनलॉक झाले आहेत. शहरात तीन ठिकाणी लोखंडी गेट व घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडे तोडून ...
अमळनेर : शासनाने अनलॉक करताच चोरटेही अनलॉक झाले आहेत. शहरात तीन ठिकाणी लोखंडी गेट व घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडे तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना ७ रोजी रात्री घडली.
लॉकडाऊनमुळे लोक बेरोजगार झाले होते. काम-धंदे नसल्याने लोक घरात होते. पोलिसांची नाकाबंदी असल्याने संशयित व्यक्ती हटकल्या जात होत्या. वाहनांवर कारवाई करताना कॅमेऱ्यात त्यांची छबी टिपली जात होती. त्यामुळे चोरट्यांना धाक होता. अनलॉक होताच लोक घराबाहेर पडले, तसे चोरट्यांनी आपला पाय बाहेर काढून दिवसा बंद घरांची रेकी करून रात्री घरफोड्या सुरू केल्या आहेत.
ढेकू रोडवरील शास्त्रीनगरमधील राजेंद्र भदाणे हे केमोथेरपीसाठी नाशिकला गेले असताना त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास केली आहे, तर जवळच ५० फुटांवर मनीषा नंदलाल पाटील यांचे पती सैन्यदलात नोकरीला आहेत. त्या माहेरी गेल्या असताना त्यांचेही घर फोडून चोरट्याने ऐवज लंपास केला आहे. धुळे रोडवरील आर.के.नगर कारखान्याच्या मागे असलेले दौलतरावनगरमधील प्राथमिक शिक्षक प्रवीण गुलाबराव वाडीले यांच्या घराबाहेर असलेल्या लोखंडी गेटचा कडी-कोयंडा तोडून घराच्या दोन्ही दरवाजांचे कुलूप तोडून घरातील दागिने, पैसे लंपास केले आहेत. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस नाईक दीपक माळी, रवींद्र पाटील यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली.
===Photopath===
080621\08jal_3_08062021_12.jpg~080621\08jal_4_08062021_12.jpg
===Caption===
घरमालक गावाला गेल्याची संधी साधत दागिने केले लंपास~घरमालक गावाला गेल्याची संधी साधत दागिने केले लंपास