काकडणे शिवारात बिबटय़ाचा तिसरा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 04:16 PM2017-08-17T16:16:49+5:302017-08-17T16:21:54+5:30
14 वर्षीय मुलगी गंभीर जखमी
ऑनलाईन लोकमत
सायगाव ता.चाळीसगाव, दि. 17- परिसरात दोन दिवसात बिबटय़ाने तिसरा हल्ला केला यात 14 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली असून गावात भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत माहिती अशी की, लोहोणेर येथील सुभाष रुपा बच्छाव हे सायगावी राहात असून 17 रोजी त्यांच्याकडे वास्तूशांतीचा कार्यक्रम होता. आदल्या दिवशी पाहुणे आले होते. सुभाष बच्छाव यांची भाची दिपाली हौसिराम मोरे (वय 14) ही रात्री साडेआठ वाजता शौचास गेली असता बिबटय़ाने हल्ला तिच्यावर केला. जखमी अवस्थेत तिला उपचारार्थ धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती गंभीर आहे. दीपाली ही खामखेडा ता.देवळा येथील रहिवासी आहे.
लोकांमध्ये भिती
बिबटय़ाने दोन दिवसात हल्ले सुरु ठेवले आहे. 16 रोजी काकडणे येथील महिला जिजाबाई वाघ हिचेवर बिबटय़ाने हल्ला केला होता तर दुपारी अडीच वाजता सखूबाई जाधव हिचेवर तर रात्री दीपालीवर हल्ला केला.
वनविभागाचे दुर्लक्ष
सायगाव व काकडणे परिसरात सहा महिन्यापासून बिबटय़ाचे वास्तव्य असून अनेक गाई, बक:यांचा त्याने फडशा पाडला आहे. वनविभागाने साधे पिंजरेही बिबटय़ास पकडण्यासाठी लावले नाहीत. वनविभागाने या बिबटय़ाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिरातून होत आहे.