तिसऱ्या भिडूमुळे वैद्यकीय शिक्षण खाते गेले, गिरीश महाजनांनी व्यक्त केली खंत
By विलास बारी | Published: September 2, 2023 09:44 PM2023-09-02T21:44:52+5:302023-09-02T21:46:06+5:30
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शनिवारी अद्ययावत शस्त्रक्रियागृहाचे उद्घाटन गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले.
विलास बारी
जळगाव : भाजप-शिंदे सेनेच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचा अजित पवार गट सहभागी झाला. त्यामुळे अनेक मंत्र्यांचे खाते काढून घेण्यात येऊन पवार गटाला देण्यात आले. त्यात माझेही वैद्यकीय शिक्षण खाते तिसऱ्या भिडूमुळे गेले, अशी खंत ग्रामविकास मंत्रीगिरीश महाजन यांनी शनिवारी जळगावात व्यक्त केली.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शनिवारी अद्ययावत शस्त्रक्रियागृहाचे उद्घाटन गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉक्टरांचे कार्य हे परमेश्वरी कार्य असून, त्यांच्या कौशल्यामुळे जनसामान्यांना मोठा आधार मिळतो. आता ग्रामविकास विभागाची जबाबदारी आपल्याकडे आहे. त्या विभागामार्फत आपले कार्य सुरूच राहणार आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधनही आमच्याच सरकारने वाढविल्याचे महाजन म्हणाले.