‘किनगाव बुद्रूक’वर आता राहणार तिसऱ्या डोळ्याची नजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:13 AM2021-07-04T04:13:11+5:302021-07-04T04:13:11+5:30

यावल : तालुक्यातील किनगाव बुद्रूक गावात ग्रामपंचायतीच्या वतीने ठिकठिकाणी १८ सीसी टीव्ही कॅमेरे लावले आले. यामुळे ग्रामस्थांमध्ये ...

The third eye will now be on ‘Kingao Budruk’! | ‘किनगाव बुद्रूक’वर आता राहणार तिसऱ्या डोळ्याची नजर!

‘किनगाव बुद्रूक’वर आता राहणार तिसऱ्या डोळ्याची नजर!

Next

यावल : तालुक्यातील किनगाव बुद्रूक गावात ग्रामपंचायतीच्या वतीने ठिकठिकाणी १८ सीसी टीव्ही कॅमेरे लावले आले. यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

तालुक्यातील किनगाव बुद्रूक हे गाव मोठे असून बाजारपेठही मोठी आहे. गेल्या महिन्यात गावात एकाच रात्री सहा घरफोड्या झाल्या होत्या. तसेच अधून-मधून विविध घटना घडत असतात. म्हणून किनगाव ग्रामपंचायतीने गावातील महत्त्वाच्या चौकासह विविध ठिकाणी १८ सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याने गुन्हेगारीवर निश्चितच वचक बसेल.

सीसी टीव्ही यंत्रणेचा लोकार्पण कार्यक्रम माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी गावातील मुख्य रस्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, हनुमान मंदिर, जामा मशीद, त्याचबरोबर चुंचाळे रस्ता या महत्त्वाच्या ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गावावर यापुढे कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने निगराणी राहणार आहे. गावाची एकता व सुरक्षा कायम राखण्यासाठी ग्रामपंचायतीचे हे कार्य चांगले असल्याचे मत पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी यावेळी व्यक्त केले व ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमास किनगाव सरपंच निर्मला पाटील, पं.स.चे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य उमाकांत रामराव पाटील, उपसरपंच लुकमान तडवी, किनगाव क्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक जितेनंद्र खैरनार, शेतकरी संघटनेचे कडू पाटील, पोलीस पाटील रेखा नायदे, किनगाव खुर्दचे सरपंच भूषण पाटील, अमिन शेख, अमन मन्यार, साधना चौधरी, मेहमूद तडवी, सफदर तडवी, लतीफ तडवी, माजी सरपंच रामकृष्ण धनगर, माजी सरपंच टिकाराम चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: The third eye will now be on ‘Kingao Budruk’!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.