भुसावळ येथे बहुप्रतीक्षेत असलेली तिसरी रेल्वेलाईन ५ डिसेंबरपासून कार्यान्वित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:51 AM2018-11-28T00:51:58+5:302018-11-28T00:55:51+5:30

भुसावळ येथील बहुप्रतीक्षेत व चर्चेत असलेली तिसरी रेल्वे लाईन ज्यामुळे मध्य रेल्वेवर असलेला रहदारीचा ताण कमी होईल ही रेल्वेलाईन ५ डिसेंबरपासून कार्यान्वित होणर आहे.

The third railway line, which will be witnessed in Bhusawal, will be operational from 5th December | भुसावळ येथे बहुप्रतीक्षेत असलेली तिसरी रेल्वेलाईन ५ डिसेंबरपासून कार्यान्वित होणार

भुसावळ येथे बहुप्रतीक्षेत असलेली तिसरी रेल्वेलाईन ५ डिसेंबरपासून कार्यान्वित होणार

Next
ठळक मुद्देरहदारीचा ताण कमी होणारतिसरे रेल्वेलाईन परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेची सूचना

भुसावळ, जि.जळगाव : येथील बहुप्रतीक्षेत व चर्चेत असलेली तिसरी रेल्वे लाईन ज्यामुळे मध्य रेल्वेवर असलेला रहदारीचा ताण कमी होईल ही रेल्वेलाईन ५ डिसेंबरपासून कार्यान्वित होणर आहे. यासंबंधीचे आदेश उपमुख्य विद्युत अभियंता मध्य रेल्वे या विभागाकडून देण्यात आले आहेत.
मध्य रेल्वेच्या सध्या फक्त दोन मुख्य रेल्वे लाईन कार्यान्वित आहेत त्यामुळे साहजिकच रहदारीचा रेल्वेचा प्रवासी गाड्यांचा खूप ताण त्या दोन रेललाईनवर पडतो त्यावर उपाययोजना म्हणून मध्य रेल्वेने वर्षभर आधी तिसºया रेल्वे लाईनचे काम हाती घेतले होते. जेणेकरून प्रवासी गाड्या-मालगाड्या यांची नियमित वेळ पाळता यावी आणि दोन रेल्वे लाईनवरील ताण कमी व्हावा याची उद्देशपूर्ती येत्या ५ डिसेंबरला होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. सदर रेल्वे लाईन कार्यान्वित करण्याचे आदेश उपमुख्य विद्युत अभियंता मध्य रेल्वे यांच्याकडून संबंधित विभागाला मिळाले आहेत. पहिल्या टप्प्यात भुसावळ ते भादली दरम्यान तिसरी रेल्वे लाईन कार्यान्वित होणार आहे. या रेल्वे लाईन दरम्यान सर्व प्रकारच्या चाचण्या होतील. जेणेकरुन पुढे तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये.
संबंधित रेल्वेलाईन सुमारे २५ हजार होल्ट्स इतकी विद्युत भारित असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता तिसºया रेल्वे लाइन दरम्यान या परिसरात राहणाºया रहिवाशांना संबंधित विभागांना आवाहन करण्यात आले आहे की, ही रेल्वेलाईन नेहमीकरिता कार्यरत राहणार आहे. त्या परिसरात कोणीही अनुचित प्रकार करू नये. तसे केल्यास संबंधित व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल.
निश्चितच तिसºया रेल्वे लाईनमुळे मध्य रेल्वेवरील रहदारीचा ताण कमी होईल व प्रवाशांना ताटकळत बसावे लागणार नाही, अशी आशा व्यक्त करण्यात ेयेत आहे.

Web Title: The third railway line, which will be witnessed in Bhusawal, will be operational from 5th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.