मे महिन्याचा तिसरा आठवडा सर्वांत दिलासादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:15 AM2021-05-24T04:15:00+5:302021-05-24T04:15:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाला एकत्रित जिल्हाभरात उतरती कळा लागली असून, रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे. मध्यंतरी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाला एकत्रित जिल्हाभरात उतरती कळा लागली असून, रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे. मध्यंतरी सर्वांत मोठे हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरात मे महिन्याचा तिसरा आठवडा हा दुसऱ्या लाटेतील सर्वांत दिलासादायक आठवडा ठरला आहे. या आठवड्यात एक दिवस सोडला तर सर्व दिवस रुग्ण संख्या ५० च्या खालीच नोंदविली गेली आहे.
शहरातील रुग्णसंख्या मध्यंतरी प्रचंड वाढली होती. मार्च, एप्रिलच्या महिन्यांच्या दरम्यान दररोज तीनशे ते चारशे बाधित दररोज सामोरे येत होते. यामुळे सर्व रुग्णालये फुल्ल झाले होते. शिवाय कोविड केअर सेंटरमध्ये १६०० रुग्णांची व्यवस्था करण्यात आलेली होती. ते देखील मध्यंतरी फुल्ल झाले होते; मात्र आता कोविड केअर सेंटरच्या दोनच इमारतींमध्ये रुग्ण असून, अन्य इमारती रिकाम्या आहेत. दुसरीकडे शहरातील खासगी रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अन्य कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण संख्या कमी आहे. एकत्रित दररोज समोर येणारे नवीन रुग्ण कमी व बरे होणारे या रुग्णांची संख्या अधिक असल्याने ही रुग्ण संख्या घटली आहे.
सक्रिय रुग्णांची संख्याही आठवडाभरात ५०८ ने घटून ६०० वर पोहोचली आहे. यातील बहुतांश रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये असल्याने शासकीय यंत्रणेवरील तेवढा ताण कमी झाला आहे. दिवसेंदिवस नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुपटीने किंवा तिपटीने अधिक आहे.
आठवड्यातील एकूण रुग्ण २८१
आठवड्यातील एकूण मृत्यू १६
आठवड्यातील बरे झालेले रुग्ण ८२१
ही कारणे
१. आधी अधिक तपासण्या होऊन बाधित विलग झालेत.
२. लाॅकडाऊनमुळे गर्दीवर काही प्रमाणात निर्बंध आल्याने संसर्ग घटला.
३. रस्त्यावर फिरणाऱ्या बाधितांचीही तपासणी होत असल्याने छुपे रुग्णही समोर आले.
१६ मृत्यू
दुसरीकडे शहरातील मृतांची संख्या ही कमी होत असून, आठवडाभरात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण गेल्या दोन आठवड्यांच्या तुलनेत व एप्रिल महिन्याच्या तुलनेत कमी असल्याने दिलासा मिळाला आहे. मध्यंतरी जळगाव शहरातीलच सर्वाधिक मृत्यू समोर येत होते. दिवसाला सात ते आठ मृत्यू होत असल्याने चिंता अधिक वाढली होती. मात्र, कोरोनाचे रुग्ण कमी होत असतानाच मृतांची संख्या हळूहळू कमी होत आहे. आठवड्यातील दोन दिवस एकही मृत्यू नव्हता.
रुग्ण
१६ मे ३४
१७ मे ६२
१८ मे ५१
१९ मे ४४
२० मे ४४
२१ मे ३०
२२ मे १६
सक्रिय रुग्ण असे झाले कमी
१६ मे ११३५
१७ मे १०७४
१८ मे ९८५
१९ मे ९१०
२० मे ८०४
२१ मे ७४१
२२ मे ६२७