पिकांचा विचार न करता भागविली गावाची तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2017 01:51 PM2017-06-10T13:51:39+5:302017-06-10T13:51:39+5:30
अशोक तुळशीराम देशमुख यांनी स्वत:च्या शेतातील पिकाचा विचार न करता गावाशेजारी असलेल्या त्यांच्या शेतातील विहीरीतून गावाला पाणी पुरवित गावाची तहान भागविली आहे.
ऑनलाईन लोकमत / सुनील लोहार
कु:हाड, जि. जळगाव दि. 10 - तीन महीन्यांपासून गावात पाण्याची भीषण टंचाई जाणवत असताना कु:हाड खुर्द येथील शेतकरी व माजी ग्रा.प.सदस्य अशोक तुळशीराम देशमुख यांनी स्वत:च्या शेतातील पिकाचा विचार न करता गावाशेजारी असलेल्या त्यांच्या शेतातील विहीरीतून गावाला पाणी पुरवित गावाची तहान भागविली आहे.
अशोक देशमुख यांनी स्वत:च्या विहीरवर बाजूला मोठय़ा हौदात पाणी भरुन तो 24 तास गावक:यासाठी खुला करून दिला. पाणी धुण्यासाठी, पिण्यासाठी व गुराढोरांसाठी वापर चांगला झाला. एकीकडे गावात आठशे रु.प्रति टँकरने पाणी विकले जात असताना या शेतक:याने मनाचा मोठेपणा दाखवून गावक:यांची समस्या सोडविण्यासाठी हातभार लावला.
शेत शिवारात शेतकरी ठिबक लागवाडीसाठी विहीरीत असलेल्या पाण्याचे नियोजन करीत असताना कोणी हंडाभर पाणी फुकट भरु देत नाही. तरी या शेतक:याने गावाची समस्या लक्षात घेता व आगामी आठ एकर ठिबकने कपाशीचे नियोजन सोडुन विहीरीचे पाणी गावासाठी उपलब्ध करुन दिले .दोन महिन्यापूर्वी त्यांनी उभ्या मक्याचे पिक सोडून पाणी मोफत पुरवण्याचा निर्णय घेतला.
गावाला अजूनही महीनाभरातून पाणीपुरवठा होतो. परंतु जोरदार पावसामुळे नदीला थोडे पाणी आल्याने गावाक:यांची गरज ब:यापैकी भागत आहे. त्यामुळे विहिरीवर आताही कमी का होईना महिला व माणसं पाण्यासाठी आलेले दिसतात.
पैसा कमविण्यापेक्षा माणुसकी महत्त्वाची आहे. लोक पाण्यासाठी भटकत असताना मी पिकांचा विचार करण्यापेक्षा लोकांचा विचार केला. मला माङया कामाने खूप समाधान मिळाले असल्याचे अशोक देशमुख यांचे म्हणणे आहे.