थर्टी फस्र्ट तिघांसाठी काळरात्र!

By admin | Published: January 2, 2016 08:34 AM2016-01-02T08:34:07+5:302016-01-02T08:34:07+5:30

धुळे : जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन ठार झाले तर सहा जण जखमी झाले.

Thirty first for three people! | थर्टी फस्र्ट तिघांसाठी काळरात्र!

थर्टी फस्र्ट तिघांसाठी काळरात्र!

Next

धुळे : जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन ठार झाले तर सहा जण जखमी झाले. त्यात एक अपघात सरत्या वर्षाच्या दुपारी तर दोन अपघात हे नववर्षाच्या मध्यरात्रीनंतर घडले.

बाळासाहेब नामदेव शेवाळे (वय 52, रा.मालेगाव), रतिलाल दामू खैरनार (वय 32, रा. जैताणे, ह.मु. कुसुंबा) व विजय पंडित मोरे (वय 45, रा.डांगुर्णे) अशी अपघातांत ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

महीर शिवारात गुरुवारी दुपारी साक्रीकडे जाणा:या (एमएच 18 एसी 1201) ट्रकने बाळासाहेब शेवाळे यांच्या (एमएच 41 व्ही 6804) कारला धडक दिली. शेवाळे यांचा मृत्यू तर अन्य 5 जण जखमी झाले. ते भटाई देवीच्या दर्शनासाठी येत होते.कुसुंबा शिवारात शुक्रवारी रात्री ट्रक व (क्र. एमएच 41 व्ही 5917) चारचाकीची समोरासमोर धडक झाली. त्यात चारचाकीचा चालक रतिलाल खैरनार जागीच ठार झाला.

 

शिक्षक ठार

तळोद्याहून अंत्यविधी आटोपून परतणारे प्राथमिक शिक्षक विजय मोरे यांच्या कारला सोनगीर-दोंडाईचा रस्त्यावर ट्रकने धडक दिली. त्यात विजय मोरे व त्यांच्या पत्नी अनिता मोरे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान विजय मोरे यांचा मृत्यू झाला.

Web Title: Thirty first for three people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.