दालमीलमधून ३८ हजाराची चना डाळ चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 03:13 PM2017-10-05T15:13:58+5:302017-10-05T15:17:02+5:30
औद्योगिक वसाहत परिसरातील गुरांच्या बाजारासमोरील जे.१ सेक्टरमधील सुप्रभा दालमीलमधून शेडचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३७ हजार ८०० रुपये किमतीचे चना डाळचे १८ कट्टे लांबविल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.दरम्यान, शेडमध्ये प्रवेश करताना दोन संशयित सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,५ : औद्योगिक वसाहत परिसरातील गुरांच्या बाजारासमोरील जे.१ सेक्टरमधील सुप्रभा दालमीलमधून शेडचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३७ हजार ८०० रुपये किमतीचे चना डाळचे १८ कट्टे लांबविल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.दरम्यान, शेडमध्ये प्रवेश करताना दोन संशयित सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्नील घनश्याम भाला (वय ३१ रा.देऊ ळगाव राजा, जि.बुलडाण ह.मु.उदय कॉलनी, जळगाव) यांच्या मालकीची औद्यागिक वसाहत परिसरात गुरांच्या बाजारासमोर सुप्रभा नावाची दालमील आहे. या मीलमध्ये दहा कामगार कामाला आहेत. प्रकाश झिपरु न्हावी (रा.नेरी,ता.जामनेर) हे वॉचमन म्हणून कामाला असून कंपनीच्याच आवारात वास्तव्याला आहेत. नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी ७ वाजता दालमील बंद करुन स्वप्नील भाला हे घरी गेले होते. तर तयार होणाºया चना डाळचे ५३ कट्टे हे शेडमध्येच ठेवलेले होते. तर शेडला कुलुप लावलेले होते.
मॅनेजरने कळविली घटना
गुरुवारी सकाळी मॅनेजर प्रितेश कैलास राठी हे कंपनीत आले असता त्यांना शेडचे कुलुप तुटलेले दिसले तर चना डाळचे ५३ पैकी १८ कट्टे गायब झालेले दिसले. त्यांनी तत्काळ ही घटना मालक भाला यांना कळविली. मालकाने कंपनीतील कामगार गोकुळ उमरसिंग पाटील, महेश श्यामराव पुरोहित व मॅनेजर राठी यांना सोबत घेऊन परिसरात कट्टे शोधले, मात्र मिळून आले नाही. सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यात १२.४६ वाजता दोन जण दालमीलच्या आवारात प्रवेश करताना दिसून येत आहेत. याच दोन जणांनी डाळ चोरल्याची संशय भाला यांनी व्यक्त केला आहे.