जळगाव जिल्ह्यात आणखी बत्तीस कोरोना बाधित रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 09:51 AM2020-05-09T09:51:31+5:302020-05-09T09:51:49+5:30
कोरोना बाधित रूग्णांची संख्या झाली 157
जळगाव -जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव येथे स्वॅब घेतलेल्या 103 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 71 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून *बत्तीस* व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेले रूग्णांमध्ये अडावद, चोपडा येथील एक, अमळनेर येथील एकतीस असे एकूण बत्तीस रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या *157* इतकी झाली असून त्यापैकी अठरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.