थोरगव्हाणला मिळाली नवीन डीपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 23:07 IST2020-10-20T23:07:35+5:302020-10-20T23:07:41+5:30
शेतकऱ्यांना दिलासा : विजेची समस्या आता सुटणार

थोरगव्हाणला मिळाली नवीन डीपी
यावल : तालुक्यातील थोरगव्हाण येथे जि. प. चे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सुर्यभान पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत विद्युत ट्रान्सफारर्मची मागणी केली असता तत्काळ या गावासाठी टान्सफार्मर मंजूर करण्यात आले. यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
साकळी -दहिगाव गटाचे जि. प. सदस्य तथा शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांच्या जिल्हा नियोजन समिती निधीतून थोरगव्हान गावासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर(डीपी) मंजूर करण्यात आले. रविंद्र पाटील व येथील पं. स. चे उपसभापती दीपक पाटील यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे परीसरातील शेतकऱ्यांना आता योग्य दाबाची व मुबलक विज मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे तीन ठिकाणी नवीन गुरांच्या उपचारासाठी खोडा देखील उपलब्ध करण्यात आले आहे विनोद पाटील, बाळू पाटील, यादव चौधरी, बाळू शिंपी, प्रमोद सपकाळे, विनोद भालेराव, व योगेश भालेराव व ग्रामस्थ उपस्थित होते.