रेल्वे स्थानकावर कसून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 10:09 PM2019-12-10T22:09:36+5:302019-12-10T22:09:42+5:30
खबरदारी : वाढत्या गर्दीमुळे श्वानपथकाचीही घेतली मदत
भुसावळ : रेल्वे प्रशासनातर्फे सणासुदीसाठी विशेष गाड्या सोडण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर येथील रेल्वे स्थानकावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सज्जतेसह श्वान पथकाकडूनही कसून तपासणी करण्यात येत आहे.
सणासुदीच्या दिवसांमध्ये रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणात विशेष गाड्या सोडण्यात येत आहे. याशिवाय भुसावळ रेल्वे स्थानकावर दररोज १३० पेक्षा जास्त गाड्या ये-जा करत असतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनातर्फे संपूर्ण रेल्वेस्थानक परिसरामध्ये १२४ पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहे. याशिवाय रेल्वे सुरक्षा बलाचे जवान व लोहमार्ग पोलिसांचाही खडा पहारा राहतो. अधिक गर्दीच्या कालावधीत भुसावळ सारख्या महत्त्वाच्या जंक्शन स्थानकावर अनुचित प्रकार घडू नये याकरिता श्वान ‘अमर’ द्वारे भुसावळ रेल्वे स्थानकावरील कानाकोपºयातही असलेल्या सामानाची तपासणी करण्यात आली. सहाय्यक फौजदार एस. आर. सपकाळे व कॉन्स्टेबल गजानन पाटील यांनी श्वान अमरच्या सहाय्याने संपूर्ण रेल्वेस्थानकाची संदिग्ध सामानाची तपासणी केली.
आरपीएफ जवानांचा पहारा
रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेकडील मुख्य व उत्तरेकडील प्रवेशद्वारा समोर प्रत्येक येणाºया प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांची करडी नजर ठेवली आहे.
याशिवाय प्रत्येक प्रवाशांकडे असलेल्या सामानाची मशिनरीद्वारे तपासणी केली जाते तसेच येणाºया प्रत्येक प्रवाशाला मेटल डिटेक्टर मधून जावे लागते. एकंदरीत रेल्वे प्रशासन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गांभीर्याने घेत असल्याचे दिसून येत आहे.