'त्या' नेत्यांमुळेच माझं तिकीट कापलं; खडसेंच्या आरोपांवर महाजन म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 06:11 PM2020-01-02T18:11:32+5:302020-01-02T18:14:55+5:30

विधानसभा निवडणुकीवेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनीच जाणीवपूर्वक माझे तिकीट कापले.

Those 'leaders' cut my ticket; Mahajan says on Khadse allegation | 'त्या' नेत्यांमुळेच माझं तिकीट कापलं; खडसेंच्या आरोपांवर महाजन म्हणतात...

'त्या' नेत्यांमुळेच माझं तिकीट कापलं; खडसेंच्या आरोपांवर महाजन म्हणतात...

Next

जळगावः विधानसभा निवडणुकीवेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनीच जाणीवपूर्वक माझे तिकीट कापले. त्यांना माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणायची होती, असा आरोप एकनाथराव खडसेंनी केल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली. नाथाभाऊंनी केलेल्या आरोपांवर लागलीच गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिलं आहे. याच विषयासंदर्भात गिरीश महाजन गुरुवारी दुपारी जामनेरात आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. 

मला वाटतं काही तरी गैरसमज किंवा चुकीची माहिती नाथाभाऊंना दिली गेलेली आहे. कोअर कमिटीच्या मीटिंगमध्ये मी विरोध केल्याचं त्यांना समजलं, असा कोणताही विरोध मी केलेला नाही. तशी चर्चासुद्धा त्या ठिकाणी झालेली नाही. राज्यात चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहता यांच्यासारख्या बड्या नेत्यांना तिकीट नाकारण्यात आले. हा निर्णय सर्वस्वी कोअर कमिटीच्या नेत्यांचा होता. मात्र, खडसेंना कुणीतरी चुकीची माहिती दिली असावी. एकीकडे एवढ्या मातब्बर नेत्यांना तिकीट मिळाली नाहीत. खडसेंच्या कन्या ऍड. रोहिणी खडसेंना तरी पक्षाने तिकीट दिले, हे लक्षात घेतले पाहिजे. ते म्हणत असतील तर या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे. त्यात दोषी आढळलो तरच या प्रकरणात आमची जबाबदारी असेल. पुराव्यांशिवाय आमच्यावर असे निराधार आरोप करणे चुकीचे आहे, असेही महाजन यावेळी म्हणाले.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे आरोप निराधार आहेत. एकीकडे एवढ्या मातब्बर नेत्यांना तिकीट मिळाली नाहीत. खडसेंच्या कन्या ऍड. रोहिणी खडसेंना तरी पक्षाने तिकीट दिले, हे लक्षात घेतले पाहिजे. ते म्हणत असतील तर या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे. त्यात दोषी आढळलो तरच या प्रकरणात आमची जबाबदारी असेल. पुराव्यांशिवाय आमच्यावर असे निराधार आरोप करणे चुकीचे आहे, असेही महाजन यावेळी म्हणाले.चुकीच्या माहितीच्या आधारे बोलणे संयुक्तिक नाही, अशा शब्दांत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Web Title: Those 'leaders' cut my ticket; Mahajan says on Khadse allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.