विनंती बदल्या झालेल्यांना कार्यमुक्ती मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:26 PM2019-12-10T12:26:56+5:302019-12-10T12:27:16+5:30

जि़ प़ : मनुष्यबळाचा अभाव, पर्यायी व्यवस्था नसल्याने कर्मचारी थांबविले

Those requesting a change are not exempt | विनंती बदल्या झालेल्यांना कार्यमुक्ती मिळेना

विनंती बदल्या झालेल्यांना कार्यमुक्ती मिळेना

Next

जळगाव : जून महिन्यात विनंती बदल्या झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाच-सहा महिने उलटूनही अद्यापही कार्यमुक्त करण्यात आलेले नसल्याचे समोर आले आहे़ जिल्हा परिषदेत मनुष्यबळाचा अभाव असल्याने या कर्मचाऱ्यांना आहे त्याच ठिकाणी थांबवून ठेवल्याची माहिती आहे़
जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचारी नसल्याचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून प्रकर्षाने समोर आला आहे़ शासनस्तरावरून पदे भरली जात नसल्याने मनुष्यबळाचा अभाव वारंवार जाणवत आहे़ अशातच जून-जुलैमध्ये समुदपदेशनाने बदली प्रक्रिया राबविण्यात आली होती़ तीन दिवस ही प्रक्रिया चालली होती़ यंदा आचारसंहितेमुळे बदल्यांचा कार्यक्रम दोन महिने विलंबाने झाला होता़ १ ते ७ जून दरम्यान ही सर्व प्रक्रिया राबविण्यात आली होती़ यात प्रशासकीय व विनंती अशा स्तरांवर या बदल्या करण्यात आल्या होत्या़ बदल्यांमध्ये पारदर्शकता राहावी म्हणून समुपदेशनाद्वारे या प्रक्रिया पार पडल्या होत्या़ यातील प्रशासकीय बदल्या झालेल्यांना कार्यमुक्त करून नियुक्तीच्या ठिकाणी पाठविण्यात आले. मात्र, विनंती बदली झालेल्या साधारण चाळीसटक्के कर्मचाºयांना कार्यमुक्त करण्यात आलेले नसल्याचे समजते़ जि.प.च्या सामान्य प्रशासन विभागातच असे तीन कर्मचारी आहेत मात्र, त्याठिकाणी पर्यायी कर्मचारी नसल्याने त्यांना कार्यमुक्त केल्यास विभागाच्या कामांवर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे़ शिवाय शिक्षण विभागातही असे काही कर्मचारी आहेत यासह आरोग्य विभागातीलही अनेक कर्मचाºयांना कार्यमुक्त न केल्याने हा मुद्दा संघटनेच्या बैठकीतही चर्चीला गेला होता़
अशा झाल्या होत्या बदल्या
यंदा विनंती बदलीसाठी पाच ऐवजी तीनच वर्ष सेवेचे निकष असल्यामुळे सुमारे २०० कर्मचारी या बदलीस पात्र होते़ दरम्यान, या बदली झालेल्या कर्मचाºयांपैकी तीस ते चाळीस टक्के कर्मचारी आहे त्याच ठिकाणी थांबून असल्याचे समजते़

प्रशासकीय बदल्या झालेल्यांना कार्यमुक्त केलेले आहे़ विनंती बदल्या ज्यांच्या होत्या अशा काही ठिकाणी पर्यायी व्यवस्था नसल्याने त्यांना सोडण्यात आलेले नाही़ सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील हे प्रशिक्षावरून परतल्यानंतर हा मुद्दा मांडला जाणार आहे़
-के़ बी़ रणदिवे, डेप्युटी सीईओ

Web Title: Those requesting a change are not exempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.