कायदा, सुव्यवस्थेत बाधा आणणाऱ्यांची खैर नाही- पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी

By विजय.सैतवाल | Published: February 27, 2024 11:50 PM2024-02-27T23:50:44+5:302024-02-27T23:51:30+5:30

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाची तयारी

Those who disrupt law and order are not welcome - Superintendent of Police Dr. Maheshwar Reddy | कायदा, सुव्यवस्थेत बाधा आणणाऱ्यांची खैर नाही- पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी

कायदा, सुव्यवस्थेत बाधा आणणाऱ्यांची खैर नाही- पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: महिला, मुले, ज्येष्ठ, वंचित घटकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यावर पोलिस प्रशासनाचा प्रयत्न राहणार असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. जो कायदा, सुव्यवस्थेत बाधा आणण्याचा प्रयत्न करेल, त्याची खैर नाही, असा इशारादेखील त्यांनी या वेळी दिली.

पोलिस अधीक्षक पदाचा पदभार घेतल्यानंतर जिल्ह्यात पोलिस दलाच्यावतीने काय उपाययोजना करण्यात येणार आहे व काय नियोजन राहणार आहे, याविषयी माहिती देण्यासाठी मंगळ‌वार, २६ फेब्रुवारी रोजी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी  पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलिस उप अधीक्षक (गृह) प्रमोद पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील आदी उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक म्हणाले की, प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये गेल्यानंतर कोणालाही कोणतीही भीती न राहता सहज फिर्याद देता यावी, असे वातावरण तयार करण्यात येईल. त्यानंतर पुराव्याच्या आधारावर कारवाई करण्यात येईल. ज्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, तेथे गोपनीय खबरे वाढवण्यावर भर राहणार असल्याचेही ते म्हणाले.

काय म्हणाले पोलिस अधीक्षक?

  • निवडणुकीची तयारी पूर्ण, सीमा भागातील चेक पोस्टवर सुविधा वाढवण्यावर भर
  • सोशल मीडियावरील पोस्टमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाई अटळ
  • सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जनजागृतीवर भर
  • गावठी कट्ट्याच्या पार्श्वभूमीवर उमर्टी येथे संयुक्त कारवाई

Web Title: Those who disrupt law and order are not welcome - Superintendent of Police Dr. Maheshwar Reddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.