बदलीसाठी बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:13 AM2021-07-20T04:13:32+5:302021-07-20T04:13:32+5:30

जळगाव : जिल्हा परिषदेतील प्रशासकीय व विनंती बदल्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने बदलीसाठी दिव्यांगाचे बनावट प्रमाणपत्र सादर ...

Those who give fake certificates for transfer will be charged | बदलीसाठी बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल

बदलीसाठी बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल

Next

जळगाव : जिल्हा परिषदेतील प्रशासकीय व विनंती बदल्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने बदलीसाठी दिव्यांगाचे बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिला आहे. यासह एकाच विभागात पाच वर्षे झालेल्यांची माहितीही मागविण्यात आली असून त्यांच्याही बदल्या करण्यात येणार आहेत.

बदलीत दिव्यांगांना प्राधान्य असते, मात्र, यासाठी त्यांना प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते, मात्र, बहुतांश वेळा काही कर्मचारी हे बोगस प्रमाणपत्र सादर करत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. यामुळे मूळ दिव्यांगांवर अन्याय होत होता. दरम्यान, या प्रमाणपत्रांची जिल्हा परिषदेकडून पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यात दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांना निलंबित करण्यात येऊ शकते, शिवाय तक्रारींचीही चौकशी होणार आहे. दरम्यान, अनेक कर्मचारी बदली होऊन देखील प्रतिनियुक्तीवर जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये ठाण मांडून आहेत. त्यांची माहिती आता प्रशासनाकडून घेतली जात आहे.

Web Title: Those who give fake certificates for transfer will be charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.