ज्यांची पात्रता ते बाहेर आणि पात्रता नसलेले ‘तेथे’ बसले, एकनाथ खडसेंनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2018 03:21 PM2018-02-04T15:21:28+5:302018-02-04T15:22:31+5:30
ज्यांची पात्रता आहे, ते बाहेर आणि अपात्र लोक तेथे बसले आहे, अशा शब्दात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आजच्या राजकीय स्थितीवर टीका केली.
जळगाव - सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे या देशाची मोठी प्रगती झाली आहे. मात्र आज त्या पात्रतेचे लोक देशात नाही. उलट ज्यांची पात्रता आहे, ते बाहेर आणि अपात्र लोक तेथे बसले आहे, अशा शब्दात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आजच्या राजकीय स्थितीवर टीका केली. भोरगाव लेवा पंचायतीच्यावतीने पाडळसे येथे लेवा पाटील समाजाचे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर कुटुंब नायक रमेश विठू पाटील, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिनी खडसे, डॉ. उल्हास पाटील, आमदार सुरेश भोळे, जळगावचे महापौर ललित कोल्हे, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, माजी आमदार रमेश चौधरी, महाअधिवेशन समितीचे अध्यक्ष विष्णू भगाळे, शिरीष चौधरी, शामल सरोदे, मंदा खडसे आदी उपस्थित होते.
या वेळी कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित मान्यनवरांनीदखील मनोगत व्यक्त केले. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या भाषणाची या वेळी सर्वाना अत्यंत उत्सुकता होती. आपल्या भाषणात एकनाथराव खडसे म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल हे या देशात जन्माला आहे, हे भाग्य आहे. त्यांच्या कार्यामुळे ते लोहपुरुष ठरले व त्यांच्यामुळे देशाची प्रगती झाली. त्यांच्या पात्रतेमुळे ते तिथर्पयत पोहचले. मात्र आज परिस्थिती उलट आहे. ज्यांची पात्रता आहे ते आज बाहेर आहे तर ज्यांची पात्रता नाही ते तेथे बसले असले असा उल्लेख त्यांनी केला.
विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव द्या
कवयित्री बहिणाबाई चौधरी या एकाच समाजाच्या नव्हत्या तर त्या खान्देश कन्या होत्या. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला त्यांचे नाव द्यावे, असा ठराव मी मांडत असल्याचे खडसे यांनी भाषणातून सांगितले.