अटलजींचे विचार भावी पिढीसाठी प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 09:07 PM2018-08-19T21:07:02+5:302018-08-19T21:11:39+5:30

वक्तृत्व, नेतृत्त्व आणि कर्र्र्तृत्त्वाचे धनी असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, कविता आणि जीवनचरित्र हे राष्ट्राची संपत्ती आहे. ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे आपल्याला प्रेरणा देत राहतील अशी संवेदना सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी व्यक्त केली.

The thoughts of Atal ji are inspirational for the future generations | अटलजींचे विचार भावी पिढीसाठी प्रेरणादायी

अटलजींचे विचार भावी पिढीसाठी प्रेरणादायी

Next
ठळक मुद्देसर्वपक्षीय नेत्यांनी दिला आठवणींना उजाळासर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत मान्यवरांची शोकसंवेदनाअटलजींच्या कवितेने झाली सुरुवात

जळगाव : वक्तृत्व, नेतृत्त्व आणि कर्र्र्तृत्त्वाचे धनी असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, कविता आणि जीवनचरित्र हे राष्ट्राची संपत्ती आहे. ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे आपल्याला प्रेरणा देत राहतील अशी संवेदना सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी व्यक्त केली.
‘अटल अनंतात, अनंत हृदये अटल संगे !’ हा सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रम सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात रविवारी घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात अटलजींनी रचलेल्या 'उनकी याद करे' या कवितेने झाली. या कवितेला जळगावच्या केशव स्मृती प्रतिष्ठानने स्वरबध्द केले होते. त्यानंतर अटलजींवरील ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अटलजी यांचे विचार, कविता व त्यांचे जीवनचरित्र हे राष्ट्राची संपत्ती असल्याचे सांगितले. त्यामुळे ते आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे पुढील पिढ्यांना दिशादर्शक ठरतील असे त्यांनी सांगितले.
माजी खासदार गुणवंतराव सरोदे यांनी अटलजींच्या निधनामुळे एका खऱ्या राष्ट्रभक्ताला मुकलो असल्याचे सांगितले.
‘अटलजी म्हणजे पाय जमिनीवर असलेले उत्तुंग व्यक्तीमत्व, राजकारणी होते. त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळात ८ परिणामकारक निर्णय झाल्याचे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितले.
यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, खासदार ए.टी.पाटील, जनसंघाचे कार्यकर्ते गजानन जोशी, भुसावळचे आमदार संजय सावकारे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जमिल देशपांडे, आर.पी.आयचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, रा.स्व. संघाचे योगेश्वर गर्गे, आम आदमी पार्टीचे ईश्वर मोरे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, डॉ.राजेंद्र फडके, जळगांव शहर गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन नारळे, शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, राष्ट्रवादीच्या प्रतिभा शिरसाठ, मुकुंद मेटकर यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. शेवटी शांतीमंत्र व दोन मिनिटे मौन पाळत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी केले.

Web Title: The thoughts of Atal ji are inspirational for the future generations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.