अभाविपच्या 52व्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनासाठी जळगावात हजारो कार्यकर्ते दाखल, छायाचित्र प्रदर्शनी’चे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 02:26 PM2017-12-24T14:26:15+5:302017-12-24T14:28:28+5:30
भारतमातेची प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहे
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 24- अभाविपचे 52वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन 24 ते 26 डिसेंबर दरम्यान जळगाव येथे होत असून या अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली आहे. या अधिवेशनासाठी जळगावात राज्यभरातून हजारो कार्यकर्ते दाखल झाले आहे. 24 रोजी सकाळी वाजता ‘स्व.लिमजी जळगाववाला छायाचित्र प्रदर्शनी’चे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा. पी.पी. माहुलीकर, पेट्रोल डिलर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चौबे यांच्याहस्ते उद्घाटन झाले. अधिवेशनस्थळी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराप्रमाणे दगडी प्रवेशद्वाराची प्रतिकृती उभारण्यात आली असून त्यामधून सर्वाचे स्वागत होणार आहे. या सोबतच भारतमातेची प्रतिकृती, भगवे ङोंडे लक्ष वेधून घेत आहे.
‘संस्कारयुक्त रोजगाराभिमुख शिक्षण’ या संकल्पनेवर यंदा होणारे हे अधिवेशन जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर होत असून अधिवेशनासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. या सोबतच येथे सर्वत्र भगवे ङोंडे लावण्यात आल्याने शिवतीर्थ मैदान भगवेमय झाले आहे. तसेच येथे ‘अभाविप’ असा उल्लेख असलेले पताके येथे लावण्यात आले असून पदाधिकारी, कार्यकत्र्याची दिवसभर लगबग सुरू होती.
येथे तुरखाटय़ांपासून झोपडय़ा उभारण्यात आल्या असून दगडी दरवाजाची प्रतिकृती पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. अधिवेशनासाठी भव्य-दिव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून त्यावरून मान्यवर संबोधित करणार आहेत.
अधिवेशनासाठी प्रमुख अतिथी म्हणून स्कायड्रायव्हिंग सारख्या साहसी खेळामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणा:या शीतल महाजन, बिहारमधील पाटना येथे आआटीआयएम प्रवेश परीक्षेसाठी चालणा:या ‘सुपर-30’चे प्रशिक्षक आनंद कुमार यांची उपस्थितीत आहे. तीन दिवस चालणा:या अधिवेशनात विद्याथ्र्यांसमोर विविध सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवरील चार प्रस्तावांवर चर्चा होणार आहे.
जळगावात होणा:या या अधिवेशनासाठी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहे. यासाठी त्यांच्या निवासाचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.
उद्या शोभायात्रेतून राज्याच्या संस्कृतीचे दर्शन
सोमवार, 25 रोजी सकाळी 9 वाजता प्रस्ताव वाचन होऊन मान्यवरांची भाषणे होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून यामध्ये सजविलेले घोडे, उंट यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील चित्ररथ सहभागी होणार आहे. याद्वारे प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट व तेथील संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. या शोभायात्रेस शिवतीर्थ मैदानापासून सुरुवात होऊन नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौकमार्गे सुभाष चौकात समारोप होणार आहे.