पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जिल्हाभरातून हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:13 AM2021-07-16T04:13:16+5:302021-07-16T04:13:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका म्हणजेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ...

Thousands of applications from all over the district for admission in polytechnic courses | पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जिल्हाभरातून हजार अर्ज

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जिल्हाभरातून हजार अर्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका म्हणजेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार जागांसाठी पंधरा दिवसात १ हजाराच्यावर विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. विशेष म्हणजे, यंदा सर्वाधिक विद्यार्थ्यांनी 'ई-स्क्रूटिनी'चा पर्याय'चा निवडला आहे.

जळगाव जिल्ह्यात पॉलिटेक्निकची १३ तर फार्मसीची १३ अशी एकूण २५ महाविद्यालये आहेत. या सर्व महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासाठीची प्रक्रियेला ३० जूनपासून सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करण्याबबत सविस्तर वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले होते. त्यातच विद्यार्थ्यांना यंदा कागदपत्रांच्या पडताळणीसाठी 'ई-स्क्रूटिनी'चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्याद्वारे ऑनलाइन अर्जाची पडताळणी होऊन अर्ज निश्चित केला जाईल. शिवाय, ज्या विद्यार्थ्याकडे संगणक किंवा मोबाइल फोन नाही ते जवळच्या सुविधा केंद्रात जाऊन ऑनलाइन नोंदणी करून प्रत्यक्ष कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज निश्चित करू शकणार आहे.

९९ टक्के विद्यार्थ्यानी निवडला 'ई-स्क्रूटिनी'चा' पर्याय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ९९ टक्के विद्यार्थ्यांनी 'ई-स्क्रूटिनी'चा' पर्याय निवडला आहे. त्यामुळे ऑनलाइन कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. तर केवळ १ टक्के विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पध्दतीने अर्ज केले आहेत.

५७४ अर्ज परिपूर्ण

तंत्रशिक्षण विभागाच्या संकेस्थळावर जळगाव जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या १ हजार अर्जांची पडताळणी सुरू आहे. यातील ५७४ परिपूर्ण असून उर्वरित अर्ज कागदपत्रांअभावी अपूर्ण असल्याची बाब समोर आली आहे. या विद्यार्थ्यांना संपूर्ण कागदपत्र अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

१) जिल्ह्यातील पॉलिटेक्निक - २५

एकूण प्रवेशक्षमता -२,५००

आतापर्यंत अर्ज - १,०००

- अर्ज भरण्याची अखेरची मुदत - २३ जुलै

विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला दहावीच्या निकालानंतर अधिक गती येणार आहे. विद्यार्थ्यांनासुध्दा दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे गुरुवारी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ही सुरळीतपणे सुरू आहे. ऑनलाइन पध्दतीने ही प्रक्रिया राबविली जात असून यंदा ई-स्क्रूटिनीचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. तंत्रशिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पुढील कार्यवाही केली जात आहे. तसेच विद्यार्थ्यांचे व्हॉट‌्स ॲप ग्रुप बनवून त्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

- एस.बी.वेस्ली, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय

००००००

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात ७२५ जागा

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात ७२५ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग (६० जागा), मॅकेनिकल इंजिनिअरिंग (६० ६०), इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग (६०), फार्मसी (६०), कॉम्प्युटर इंजिनिअरिंग (६० ३०), आयटी (६०), इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (६०), सिव्हिल इंजिनिअरिंग-मायनॉरिटी (६०), मॅकेनिकल इंजिनिअरिंग-मायनॉरिटी (६०) आदी जागांचा समावेश आहे.

Web Title: Thousands of applications from all over the district for admission in polytechnic courses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.