भुसावळ तालुक्यातील साकरी येथून हजारो ब्रास गौणखनिज उचलण्याचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 04:24 PM2018-11-27T16:24:40+5:302018-11-27T16:26:37+5:30

भुसावळ तालुक्यातील साकरी येथील येथील पाझर तलावातून राष्ट्रीय महामागार्साठी जिल्हाधिकाºयांनी १० हजार ७१३ ब्रास गौणखनिज उचलण्याची परवानगी दिली आहे. ठेकेदाराने मात्र २० ते २५ डंपर डंपर लावून रात्रंदिवस हजारो ब्रास गौणखनिज उचलण्याचा सपाटा सुरू केला आहे.

Thousands of brass mineral water from Sakri in Bhusawal taluka | भुसावळ तालुक्यातील साकरी येथून हजारो ब्रास गौणखनिज उचलण्याचा सपाटा

भुसावळ तालुक्यातील साकरी येथून हजारो ब्रास गौणखनिज उचलण्याचा सपाटा

Next
ठळक मुद्देपरवानगी सहा डंपर लावण्याची, डंपर लावले मात्र तीन ते चार पटस्थानिक ग्रामस्थांनी हरकत घेतल्यानंतर प्रकार आला उघडकीसजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची ऐशी तैशी

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील साकरी येथील येथील पाझर तलावातून राष्ट्रीय महामागार्साठी जिल्हाधिकाºयांनी १० हजार ७१३ ब्रास गौणखनिज उचलण्याची परवानगी दिली आहे. ठेकेदाराने मात्र २० ते २५ डंपर डंपर लावून रात्रंदिवस हजारो ब्रास गौणखनिज उचलण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे या प्रकारासंदर्भात नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून, शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ग्रामस्थांनी या डंपरला अटकाव केल्यामुळे प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना हा प्रकार दूरध्वनीवरून सांगितला. मात्र ठेकेदारावर कोणतीही कारवाई न करता तहसीलदारांनी केवळ समज दिली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गौणखनिज चोरी कुणाच्या आशीवार्दाने सुरू आहे, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तसेच गौणखनिज उचलण्याचे धाडस ठेकेदार करतोस कसा, अशी चर्चा सुरू झाली आहे.
साकरी येथून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या महामागार्साठी साकरी येथील गट क्रमांक २५४ मधील जिल्हा परिषदेच्या पाझर तलावातून गौण खनिज (गाळ) उचलण्याची परवानगी जिल्हाधिकाºयांनी दिली आहे. जिल्हाधिकाºयांनी केवळ सहा डंपरने १ ते ३० नोव्हेंबरपर्यंत गौणखनिज उचलण्याची परवानगी दिली आहे. यात १० हजार ७३० ब्रास गौणखनिज उचलण्याचे नमूद केले आहे. ठेकेदाराने मात्र तब्बल २० ते २५ डंपर लावून हजारो ब्रास गौणखनिज उचलण्याचा सपाटा सुरू केला आहे. यासंदर्भात ठेकेदार जिल्हाधिकाºयांच्या आदेशाची ऐशी तैशी करून गौणखनिज उचलत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी शनिवारी रात्री या डंपरला रात्रीची परवानगी आहे का, असा प्रश्न विचारून गौनखनिज उचलण्यासाठी मज्जाव केला. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. तहसीलदारांनी संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या गौणखनिज वाहतुकीस कुणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे, तर ठेकेदाराने महिनाभरात किती ब्रास गौणखनिज उचलले याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, हा पाझर तलाव जिल्हा परिषद मालकीचा आहे. जिल्हा परिषदेने या तलावातून गौणखनिज उचलण्याची परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले किंवा जिल्हा परिषदेने तसा ठरावही केला नसल्याचे समजते. जिल्हाधिकाºयांनी मात्र या तलावातून दोन महिन्यात २० हजार ब्रास गाळ उचलण्याची परवानगी दिली आहे तर ठेकेदाराने मात्र जिल्हाधिकाºयांच्या आदेशाची ऐशी तैशी करून तब्बल वीस ते पंचवीस डंपर लाउन रात्रंदिवस २४ तास हजारो ब्रास गौणखनिज उतरण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या २८ रोजी होणाºया सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित होणार असल्याचे समजते.

समज दिली- तहसीलदार थोरात
यासंदर्भात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधला असता, शनिवारी रात्री काही डंपर गौणखनिज वाहत असल्याची तक्रार आली होती. या तक्रारीवरून संबंधित ठेकेदारास समज देण्यात आली आहे. कारवाई मात्र करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. हे गौणखनिज राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी नेण्यात येत असल्याचे तहसीलदार थोरात यांनी सांगितले.

Web Title: Thousands of brass mineral water from Sakri in Bhusawal taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.