४२ हजाराची रोकड असलेली लांबविलेली बॅग सापडली महामार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 10:03 PM2019-11-27T22:03:47+5:302019-11-27T22:04:01+5:30

रोकड गायब : मंगल कार्यालयातून लांबविली अल्पवयीन मुलाने

 Thousands of cash bags were found on the highway | ४२ हजाराची रोकड असलेली लांबविलेली बॅग सापडली महामार्गावर

४२ हजाराची रोकड असलेली लांबविलेली बॅग सापडली महामार्गावर

Next

जळगाव : स्रेहसंमेलनासाठी आलेल्या योगेश शांताराम जगताप (२९, रा.वाकडी, ता.सोयगाव, जि.औरंगाबाद) या तरुणाची ४२ हजार रुपये रोकड असलेली बॅग मंगळवारी दुपारी लाडवंजारी मंगल कार्यालयातून लांबविण्यात आली. बुधवारी सकाळी ही बॅग अजिंठा रस्त्यावरील लोकमत कार्यालयाच्या बाहेर आढळून आली. त्यातील ४१ हजार ५८० रुपये गायब झाले होते तर पाकीटात लपविलेले अडीच हजार रुपये मात्र सुरक्षित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश जगताप यांचे बनोटी येथे चप्पल बुट विक्रीचे दुकान आहे. मंगळवारी लाडवंजारी मंगल कार्यालयात स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम झाल्यानंतर ते खरेदीसाठी जाणार होते. दुपारी दीड वाजता परत निघताना त्यांना बॅग गायब झाल्याचे जाणवले. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर काहीच माहिती व बॅग न मिळाल्याने जगताप सायंकाळी परत गावाला निघाले.
सीसीटीव्ही एक मुलगा कैद
बॅगेत ४२ हजाराच्यावर रक्कम असल्याने जगताप यांनी मंगलकार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुपारी १ वाजता लाल शर्ट परिधान केलेला अल्पवयीन मुलगा बॅक लांबवितांना कैद झाला आहे. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
‘लोकमत’ कर्मचाऱ्याला सापडली बॅग
लोकमतचे कर्मचारी भिमा भोरे हे बुधवारी सकाळी ११ वाजता एमआयडीसीतील मुख्य कार्यालयात जात असताना प्रवेशद्वाराच्या बाजुला रस्त्याच्या कडेला बॅग आढळून आली. त्यांनी ही बॅग प्रशासन विभाग व सुरक्षा विभागाच्या प्रमुखाकडे सादर केली. बॅगेत अडीच हजार रुपये रोख व काही कागदपत्रे होती, त्यातील मोबाईल क्रमांकावरुन जगताप यांच्याशी संपर्क साधण्यात आला. दुपारी चार वाजता सुरक्षा विभागाचे प्रमुख ठाकूर यांच्याहस्ते त्यांना ही बॅग परत देण्यात आली.

Web Title:  Thousands of cash bags were found on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.