परतीच्या पावसामुळे कापूस भावात एक हजारांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 06:19 PM2017-10-13T18:19:13+5:302017-10-13T18:23:39+5:30
भुसावळात ओला ३५०० तर कोरड्या कापसाला ४५०० रुपये भाव
आॅनलाईन लोकमत
भुसावळ,दि.१३ : दिवाळी सहा दिवसावर येऊन ठेपली मात्र अद्याप कापूस खरेदी केंद्र सुरू नाहीत. परतीच्या पावसामुळे ओला झालेल्या कापसाच्या भावात तब्बल एक हजर रुपयांचे नुकसान शेतकºयांना सहन करावे लागत आहे. खाजगी बाजारपेठत कापसाला तीन हजार ते चार हजार २०० रुपयापर्यंतचा भाव मिळत आहे.
गेल्या वर्षी खाजगी बाजारपेठेत पाच हजार रुपये क्विंटलने कापसाची खरेदी सुरू झाली होती. नोटबंदीचा प्रभाव होता. कापसाचा भाव मात्र डिसेंबर ते मार्च महिन्यात पाच हजार ७०० रुपयापर्यंत पोहोचला होता. एप्रिल महिन्यात कापसाचे फरदड दुय्यम दर्जाचे उत्पन्न जास्त आल्यामुळे प्रथम दर्जाच्या कापसाचे भाव पुन्हा कमी झाले होते. फरदडला चार हजार ते चार हजार ८०० रुपये भाव होता. त्यामुळे प्रथम दर्जाला कापसाचा मंदी आली होती. मात्र मे व जून महिन्यात प्रथम दर्जाचा कापूस ५ हजार ३०० रुपयापर्यंत विकला गेला होता.
जिल्ह्यात कापसाच्या पेºयात वाढ
गेल्या वर्षी कापसाचे उत्पन्न चांगले झाले होते. त्यात यावर्षी कापसाचा पेरा देशात १८ तर जगात १० टक्के वाढला, त्यामुळे उत्पन्न वाढले, अशी माहिती जिल्हा मार्केट असोसिएशनचे उपाध्यक्ष जीवनसिंग बयास यांनी दिली.
सध्या कापूस वेचणीच्या काळात असताना परतीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. सध्या कोरड्या कापसाला चार हजार ५०० भाव आहे. तर ओला कापूस मात्र तीन हजार ५०० ते चार हजार रुपये भावाप्रमाणे खरेदी केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.
सरकी व ढेपचे भाव कोसळले
गेल्या वर्षीच्या तुलनेत सरकी व ठेपचे भाव खूपच कमी आहे. त्यामुळे कापसाच्या भावावर त्याचा परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी ठेपचे भाव आॅक्टोबरमध्ये दोन हजार होते. यावर्षी हे भाव एक हजार १०० रुपये आहे. तब्बल ८०० ते ९०० रुपये भावाची तफावत आहे. सरकीचे भाव ही गेल्या वर्षी दोन हजार ७०० रुपये होते. यावर्षी ते एक हजार ८०० ते एक हजार ९०० इतके आहे. त्याचा परिणाम कापसावर दिसून येत आहे.
सध्या जिल्ह्यात तुरळक स्वरुपाचा पाऊस पडत असल्याने काही प्रमाणात कापूस ओला येत आहे. मात्र दिवाळीसाठी शेतकºयांना हा कापूस खाजगी बाजारपेठेत मिळेल त्या भावाने विकावा लागत आहे.