मुक्ताईनगर येथे मार्गशीर्ष महिन्याच्या एकादशी वारीनिमित्त मुक्ताईचे घेतले हजारो भाविकांनी दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 09:21 PM2019-01-01T21:21:35+5:302019-01-01T21:22:50+5:30
कॅलेंडर वर्षांमधील मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व बघता श्री संत मुक्ताईचे दर्शन घेण्यासाठी मुक्ताईनगर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. विविध धार्मिक उपक्रम व पूजन झाले. मार्गशीर्ष महिना हा धार्मिकदृष्ट्या विविध योजना मार्गी लावण्याचा महिना समजला जातो. त्यामुळे अध्यात्म व धार्मिक दृष्ट्या या महिन्याच विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या एकादशी वारीनिमित्त मुक्ताईनगर येथील श्रीक्षेत्र कोथळी येथे व नवीन मुक्ताई मंदिर परिसरात वारकऱ्यांची आज मोठी गर्दी जमली.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : कॅलेंडर वर्षांमधील मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व बघता श्री संत मुक्ताईचे दर्शन घेण्यासाठी मुक्ताईनगर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. विविध धार्मिक उपक्रम व पूजन झाले. मार्गशीर्ष महिना हा धार्मिकदृष्ट्या विविध योजना मार्गी लावण्याचा महिना समजला जातो. त्यामुळे अध्यात्म व धार्मिक दृष्ट्या या महिन्याच विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या एकादशी वारीनिमित्त मुक्ताईनगर येथील श्रीक्षेत्र कोथळी येथे व नवीन मुक्ताई मंदिर परिसरात वारकऱ्यांची आज मोठी गर्दी जमली. जवळपास ५० दिंड्यांनी ज्यामध्ये मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या विविध भागातून संत मुक्ताई देवस्थानावर उपस्थिती लावली. त्याचबरोबर बारस क्या दिवशी झेंडूजी महाराज बिडकर यांची पुण्यतिथी असल्याने खान्देशच्या भाविकांसाठी एक मोठी मांदियाळी असल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी या ठिकाणी होती.
नवीन मुक्ताई मंदिरात संस्थानचे अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्याहस्ते महापूजा करण्यात आले, तर जुने मुक्ताई मंदिरात विनोद पाटील मनुरकर यांच्याहस्ते महापूजा करण्यात आली.
जुने मुक्ताई मंदिरात गंभीर चौधरी विटवे, विष्णू राणे कोथळी, भागवत भिसे बोदवड तसेच चिनावलच्या ग्रामस्थांनी संत मुक्ताई मंदिर विठ्ठल मंदिराच्या ठिकाणी फराळ वाटप केले. त्याचबरोबर ईश्वर महाराज पाळधीकर व विश्वंभर महाराज तिजारे यांचे कीर्तनदेखील झाले.
नवीन मुक्ताई मंदिरात व्यवस्थापक रवींद्र हरणे महाराज यांचे कीर्तन झाले तर साकरी व वाघारी येथील ग्रामस्थांतर्फे महाभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आजच्या दिंडी सोहळा व मार्गशीर्ष वारी सोहळ्याच्यासाठी संस्थानचे अध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, व्यवस्थापक हरिभक्त परायण रवींद्र हरणे आणि हरिभक्त परायण उद्धव जुनारे यांनी प्रयत्न केले.