हमीभावापेक्षा खुल्या बाजारात जादा भावामुळे खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 08:06 PM2019-02-04T20:06:57+5:302019-02-04T20:08:09+5:30

मक्याला हमीभावापेक्षा खुल्या बाजारात जास्त भाव मिळत असल्याने शेतकºयांनी खरेदी विक्री संघाकडे पाठ फिरविली आहे. हमीभाव १७००, तर खुल्या बाजारातील भाव १९०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल असल्याने शेतकरी खुल्या बाजारात मका विक्रीसाठी नेत आहे.

Thousands of farmers in the open market more than guaranteed purchase | हमीभावापेक्षा खुल्या बाजारात जादा भावामुळे खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ

हमीभावापेक्षा खुल्या बाजारात जादा भावामुळे खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ

googlenewsNext
ठळक मुद्देशासनाचा हमीभाव १७००, ८३ खुल्या बाजारातील भाव प्रति क्विंटलला १९०० ते १९५० रुपयेगिरणा पट्टा बागायती म्हणून ओळखशासनाच्या फर्माननंतर मक्याच्या भावात आली तेजी

गोंडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : मक्याला हमीभावापेक्षा खुल्या बाजारात जास्त भाव मिळत असल्याने शेतकºयांनी खरेदी विक्री संघाकडे पाठ फिरविली आहे. हमीभाव १७००, तर खुल्या बाजारातील भाव १९०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल असल्याने शेतकरी खुल्या बाजारात मका विक्रीसाठी नेत आहे.
गिरणा पट्टा तसा बागायती म्हणून ओळखला जातो. या पट्ट्यात तसे केळी, ऊस, कपाशी या बरोबर लिंबू, मोसंबी, डाळींब सीताफळ असे पिके घेतली जातात. परंतु यंदा पावसाने दगा दिल्याने बºयाच शेतकºयांनी मका पिकाला प्राधान्य दिले. कमी पाण्यातदेखील मका पीक येत असल्याने शेतकºयांची मक्याला सर्वाधिक पसंती दिली आणि भरमसाट लागवड केली आहे. एक महिन्यांपूर्वी चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याला १३०० ते १४०० रुपये भाव मिळत होता. बºयाच व्यापाºयांनी मक्याची साठवणूक केल्याने बाजारात मक्याला सोन्याचे भाव मिळत आहे.
शासनाचा हमीभाव १७०० रुपये प्रतिक्विंटल असा असल्याने व आजमितील खुल्या बाजारात मका १९०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात असल्याने सध्या तालुका खरेदी विक्री संघाकडे हमीभावाने खरेदी करण्यासाठी व नवे नोंदविण्यासाठी शेतकºयांनी चक्क पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. गेल्या १५ा दिवसांपासून मक्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.
शासनाचे फर्मान
हमीभावापेक्षा कमी भावाने माल शेतकºयांनी विक्री करू नये, असे फर्मान डिसेंबर महिन्यात काढले होते. परंतु त्याचवेळी हमीभावपेक्षा ५० ते १०० रुपयांनी मक्यात तेजी आलेली असल्याची माहिती चाळीसगाव तालुका खरेदी विक्री संघाकडून मिळाली.
केवळ चार शेतकºयांनीच शासनास माल मोजला
हमीभावाची नोंदणी शेतकºयांसाठी १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर अशी होती. त्यात चाळीसगाव तालुका खरेदी विक्री संघाकडे या काळात ४१ शेतकºयांनी मका मोजणीसाठी नोंद केली होती. परंतु प्रत्येक्षात चार शेतकºयांनीच माल तालुका खरेदी विक्री संघाकडे मोजला आणि उर्वरित ३७ शेतकºयांनी खुल्या बाजारात हमीभावापेक्षा जास्तीच्या भावाने बाजार समितीत माल विकला असल्याचे चाळीसगाव तालुका खरेदी विक्री संघातील लिपिक विकास पाटील यांनी सांगितले.
शासनाचे उदासीन धोरण
खुल्या बाजारात असेच दर स्थिर किंवा वाढत राहिल्यास शासनाच्या हमीभाव केंद्राकडे शेतकरी फिरूनही पाहणार नाही. शासन एकीकडे हमीभाव केंद्र सुरू करते आणि त्याचवेळी बारदान नसते कुठे मापाडी नसतो तर कुठे माल ठेवण्यास जागा उपलब्ध होत नसते. या उदासीन धोरणामुळे शेतकºयांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाला ४०० ते ५०० मका पोत्यांची आवक होते. शासनाच्या हमीभावापेक्षा शेतकºयांना बाजार समितीत चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी चांगलाच सुखावला आहे.
-अशोक आनंदा पाटील, प्रभारी सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, चाळीसगाव

Web Title: Thousands of farmers in the open market more than guaranteed purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.