यावलला मोफत आरोग्य तपासणी व औषधी वाटप शिबिराचा हजारावर गरजूंनी घेतला लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:18 AM2021-09-19T04:18:32+5:302021-09-19T04:18:32+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुक्रवारी यावल तालुका भाजपा वैद्यकीय आघाडीने येथील भुसावळ रस्त्यावरील आई हॉस्पिटलमध्ये जनतेसाठी मोफत ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुक्रवारी यावल तालुका भाजपा वैद्यकीय आघाडीने येथील भुसावळ रस्त्यावरील आई हॉस्पिटलमध्ये जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . शिबिराचे उद्घाटन आमदार गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे व खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले .
वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे, डॉ. धीरज चौधरी, डॉ. प्रशांत जावळे, डॉ. पराग पाटील, डॉ. प्रवीण पाटील यांनी मोफत रुग्ण तपासणी व मोफत औषध वाटप केले. १२०० गरजू रुग्णांनी लाभ घेतला तर ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या प्रसंगी जळगाव जिल्हा भाजप युवा मोर्चा अध्यक्ष श्रीकांत महाजन, हिरालाल चौधरी, विलास चौधरी, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, रावेर तालुकाध्यक्ष राजेंद्र लासूरकर, शहराध्यक्ष नीलेश गडे, फैजपूर शहराध्यक्ष आनंद नेहेते, नारायण चौधरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष रितेश बारी, मनोज धनगर, ॲड. गोविंद बारी, प्रमोद नेमाडे, परेश नाईक, व्यंकटेश बारी, भूषण फेगडे, संदीप भारंबे आदी आदी उपस्थित होते.
रक्तदान शिबिरासाठी जळगाव येथील माधवराव गोळवलकर रक्तपेढीचे सहकार्य लाभले .
या शिबिरास अनमोल............... भारतीय जनता पार्टी, डॉ. कुंदन फेगडे मित्र परिवार तसेच संपर्क प्रमुख सागर लोहार, मनोज बारी, विशाल बारी, लीलाधर काटे, आई हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
आरोग्य शिबिरांसाठी नोंदणी करताना महिलांची झालेली गर्दी. सोबत आयोजक आदी.